Share

माणुसकीला काळीमा! पती अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार, पत्नी मोबाईलमध्ये काढायची व्हिडीओ

गुजरातच्या तापी जिल्ह्यातून बलात्काराची अशी घृणास्पद घटना समोर आली आहे की, जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चर्चच्या पाद्रीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीने पीडित मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या पत्नीनं देखील या काळ्या कृत्यात त्याला साथ दिली आहे.

दक्षिण गुजरातमधील तापी हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तापी जिल्ह्यातील सोनगढ हद्दीतील चर्चमध्ये बळीराम कोकणी हा पाद्री होता. तो आणि त्याची पत्नी अनिता कोकणी सोनगढ हद्दीत राहत होते. त्याने गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे.

आश्चर्यकारक बाब म्हणजे या कृत्यात त्याची पत्नी अनिता हिने देखील त्या नराधमाला मदत केली आहे. पती-पत्नी दोघांनी पीडित मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करत अत्याचार सहन करण्यास भाग पाडलं आहे. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी सोनगढ पोलिसांनी पती-पत्नी दोघांना अटक केली आहे. तापी जिल्ह्याचे पोलिसप्रमुख आरएल मावाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही तिच्या आजीसोबत आरोपी पाद्री बळीरामच्या शेतात मजुरीसाठी जात होती. तसेच ती आपल्या आई-वडिलांसोबत चर्चमध्ये देखील यायची. त्यामुळे तिची आरोपी पाद्रीशी चांगली ओळख होती.

या ओळखीचा फायदा घेत आरोपीनं पीडितेवर ती शेतात कामासाठी आली असता तिच्यावर बलात्कार केला. आरोपीनं पाद्रीने पीडितेला शेतात बांधलेल्या एका झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. यावेळी पाद्रीची पत्नी अनिता देखील तिथे उपस्थित होती. तिने पीडित मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचा व्हिडीओ शूट केला आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चचा पाद्री अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. पीडित मुलीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यांनतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. सोनगढ पोलिस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत. या घटनेमुळे पूर्ण परिसर हादरला आहे आणि चर्चच्या पाद्रीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! मुलासाठी राणेंनी सोडले राजकारण, म्हणाले, ‘मला आता विश्रांतीची गरज आहे’
माणुसकीला काळीमा! पती अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार, पत्नी मोबाईलमध्ये काढायची व्हिडीओ
खरोखर कोरोना वाढतोय की फक्त सर्दी-तापाचीच साथ पसरलीय? तज्ञांनी दिली वेगळीच माहिती

क्राईम

Join WhatsApp

Join Now