Homeआरोग्यखरोखर कोरोना वाढतोय की फक्त सर्दी-तापाचीच साथ पसरलीय? तज्ञांनी दिली वेगळीच माहिती

खरोखर कोरोना वाढतोय की फक्त सर्दी-तापाचीच साथ पसरलीय? तज्ञांनी दिली वेगळीच माहिती

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यातच काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व बोचऱ्या थंडीने राज्यात पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. बहुतांश क्लिनिकमध्ये व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे राज्यात सर्दी, खोकला, ताप यासह श्वसनविकारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची चिंता वाढली आहे. मात्र या रुग्णांची करोना चाचणी केल्यानंतर फार कमी प्रमाणात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे राज्यातील नागरिकांनी पुरेपूर काळजी घ्या, पण काळजी करू नका आणि थंडीपासून बचाव करा, कोमट पाणी प्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.या वातावरणामुळे लहान मुले मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत. लहान मुलांचे कोविड लसीकरण न झाल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर म्हणाले, “सध्या सर्व वयाच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप असे आजार दिसून येत आहेत. दमा, श्वसनविकार व अलर्जीचे रुग्णही राज्यात लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे जाणवत आहे. विशेषत: भारतात हिवाळा हा ‘हेल्दी सीझन’ म्हणून ओळखला जातो. पण सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बालकांना बसत आहे.”

प्रौढ रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून येत असल्याचे सांगताना फिजिशियन डॉ. आनंद अग्रवाल म्हणाले, “सर्दी, खोकला, ताप, दमा, ब्राँकायटिस आणि सीओपीडीच्या रुग्णांचा आजार बळावल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. मात्र लक्षणांवरुन केलेल्या चाचणीत आतापर्यंत तरी फार कमी करोना रुग्ण आमच्याकडे आढळून आले आहेत.”

“सध्या तरी राज्यात बहुतांश रुग्ण हे ‘व्हायरल’चे आहेत. ताप व इतर लक्षणे असलेल्या प्रत्येकाची आम्ही करोना चाचणी करुन घेत आहोत. त्यामध्ये एक किंवा फार तर दोन टक्के रुग्ण हे करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत”, असे निरीक्षण फिजिशियन डॉ. अनंत कडेठाणकर यांनी नोंदवले आहे. “राज्यातील नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घेतल्यास आजार बळावणार नाही”, असे फिजिशियन डॉ. अनंत कडेठाणकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारचं नागिकांना मोठं गिफ्ट; सिलेंडरच्या किंमतीत केली तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी कपात
सद्दाम हुसैन यांच्या मृत्युच्या १५ वर्षांनंतर त्यांच्या मुलीने केली ‘ही’ विनंती
माझ्याशी संबंध ठेव म्हणत बळजबरी करत होता ठेकेदार, संतापलेल्या महिलेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल