फुलपाखरु मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी हृता दुर्गुळे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. डिसेंबर महिन्यात हृताने बॉयफ्रेंड प्रतिकसोबत साखरपूडा केला होता. त्यानंतर आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. सध्या या दोघांचे लग्न चांगलेच चर्चेत आले आहे. (hruta durgule wedding photo)
हृता आणि प्रतिकच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनीही त्यांना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मराठी सिरीयल्स ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवरुन हे फोटो पोस्ट करण्यात आले आहे,जे की चांगलेच व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये हिंदी टिव्ही सिरीयल्समधील बरेच कलाकार दिसून येत आहे. हा फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर अनेक कमेंट केल्या आहे. तसेच अनेकांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे.
हृता आणि प्रतिकने बुधवारी मुंबईत लग्न केले आहे. हा लग्न सोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला आहे. या लग्नसोहळ्यात फक्त तिचे खास मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्या दोघांचे कुटुंबिय उपस्थित होते. जास्त लोकांना या लग्न सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले नव्हते.
हृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे खास फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दोघेही पारंपारिक वेशभूषेत दिसून येत आहे. या वेशभूषेत हृता आणि प्रतिक दोघेही खुप सुंदर दिसत आहे. यावेळी हृताने पिवळ्या रंगाची आणि लाल काठ असलेली साडी घातली आहे, तर प्रतिकने व्हाईट शेरवानी परीधान केलेला आहे.
दरम्यान, हृताने गुपचूप लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे. सध्या या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. या लग्न सोहळ्याला काही मराठी कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारला जमलं नाही, तर मध्य प्रदेशनं करुन दाखवलं; १४ दिवसांत ओबीसींना मिळालं आरक्षण
हिंदू मंदिरांना, विद्यापीठांना, संस्थांना भरभरून दान देणाऱ्या ‘या’ मुस्लिम शासकाबद्दल माहिती आहे का?
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार; ‘या’ दिवशी वाजणार सनई चौघडा