सध्या मराठीत दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत असून ते प्रेक्षकांना भूरळ घालताना दिसून येत आहे. धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव हे चित्रपट थेट बॉलिवूडला टक्कर देताना दिसून येत आहे. या चित्रपटांनी काहीच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. (hruta durgule share time pass 3 teaser)
अशात दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी जाधव यांनी त्यांचा चित्रपट टाईमपास ३ ची घोणषा केली आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे दिसून येणार आहे.
टाईमपासच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षक तिसरा भाग रिलीज होण्याची वाट पाहत आहे. असे असतानाच आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत यामध्ये हृताचा एक हटके लूक पाहायला मिळत आहे.
हृता या चित्रपटात बिंधास्त गर्ल म्हणून दिसून येणार आहे. ती या चित्रपटात खुपच डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. तसेच तिचा अभिनय आणि तिचे डायलॉगही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच यावेळी टाईमपासमधला दगडू म्हणजेच प्रथमेश परबचीही झलक पाहायला मिळाली आहे.
पहिल्या दोन भागात प्रथमेश परबच्या दगडूच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे यंदाही तो त्याची जादू कायम ठेवेल असे म्हटले जात आहे. हा टीझर पाहून टाईमपास ३ या चित्रपटालाही प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी चर्चा रंगली आहे.
टाईमपास २ मध्ये दगडू आणि प्राजुच्या लग्नाची गोष्टी पाहायला मिळाली होती. पण त्या लग्नाआधी त्यांच्या स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आला होता, तो म्हणजे पालवी दिनकर पाटील. पालवीची भूमिका हृताने साकारलेली आहे. तिची जेव्हा एंट्री होते तेव्हा नक्की काय होतं? हे या चित्रपटात दाखवले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या ११.२२ सेकंदात शर्यत जिंकत मालकाला जिंकून दिला जेसीबी, ‘या’ जोडीची पुर्ण राज्यात चर्चा
दीप्ती ध्यानीने पती सुरजच्या आरोग्यासाठी काढले डोक्यावरचे सगळे केस, अभिनेता म्हणाला, हेच आहे…
केकेच्या निधनानंतर प्रितमला बसला धक्का, म्हणाला, तो पक्का फॅमिली मॅन होता, त्याने कधीही…