शिवाजी पार्कमध्ये लतादिदींचे स्मारक करण्याबाबत ह्रदयनाथ मंगेशकरांनी दिली प्रतिक्रीया, म्हणाले कृपया..

प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. (hrudaynath mangeshkar on lata mangeshkar smarak)

आता विविध क्षेत्रातून लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक व्हावे अशी मागणी केली जात आहे. आता याप्रकरणी लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक व्हावे, या मागणीवरुन होणारे राजकारण थांबवावं, असे कळकळीचे आवाहन हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली असेल, असेही हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते.

दीदींच्या स्मारकावरुन जो वाद सुरु आहे. तो राजकारण्यांनी थांबवावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करु नये. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली असेल. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन लतादीदींना दिले होते, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटले आहे.

संगीत विद्यालय संदर्भात स्वत: लता दीदींनी सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही विनंती मान्य करुन त्या संदर्भात पूर्वतयारी केली आहे. दीदींचे संगीत स्मारक तयार होत आहेत यापेक्षा अन्य कोणतेही स्मारक मोठे स्मारक होऊ शकत नाही, असेही हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईतील कलिना कॅम्पससमोरील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ३ एकर जागेवर हे लतादीदींचं संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली होती. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचं लतादीदींचं स्वप्न होतं, पण वेळेत जागा उपलब्ध झाल्याने त्यावेळी ते होऊ शकले नव्हते. पण आता लवकरच ते पुर्ण होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
मगरीने बकरीला खाल्ल म्हणून गावकऱ्यांनी घेतला असा बदला, वाचून येईल अगांवर काटा
बॉसने कर्मचाऱ्याला गिफ्ट केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक
रामदास आठवलेंनी घेतला शशी थरूर यांचा इंग्रजीचा क्लास, गंमतीशीर ट्विट्स झाले व्हायरल