Share

धक्कादायक! हृतिक रोशनच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा

बॉलिवूडमधून काही दिवसांतून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहे. असे असतानाच आता रोशन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृतिक रोशनची आजी पद्मा राणी ओमप्रकाश यांचे निधन झाले आहे. (hritik roshan grandmother death)

पद्मा या दीर्घकाळापासून आजारी होत्या, त्यांचे वयाच्या ९१ व्यावर्षी निधन झाले आहे. गुरुवारी १६ जून रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पद्मा राणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हृतिकची आजी पद्मा राणी यांच्या आधी त्याचे आजोबा ओमप्रकाश मेहरा यांचे निधन झाले. ओमप्रकाश यांचे ७ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. ‘आप की कसम’, ‘अर्पण’,’आदमी खिलौना है’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपली एक वेगळी ओळख बनवली होती.

ओमप्रकाश यांच्या निधनानंतर पद्मा राणी गेल्या काही वर्षांपासून रोशन कुटुंबासोबत राहत होत्या. आईच्या निधनानंतर त्यांची मुलगी पिंकी रोशनने इंस्टाग्रामवर त्यांचे अनेक फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक व्यक्त केला आहे.

हृतिक रोशन त्याच्या आजी-आजोबांच्या खूप जवळ होता. हृतिक रोशन सोशल मीडियावर आजी-आजोबांसोबत फोटो शेअर करायचा आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास नोट्सही लिहायचा. हृतिक अनेकदा त्याच्या आजीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसायचा.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो दोन ते तीन चित्रपटांमध्ये काम करत आहे. येत्या काही दिवसांत तो दीपिका पदुकोणसोबत फायटर, सैफ अली खानसोबत विक्रम वेधा अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या हृतिक सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
करोडपती कुटुंबातील महिलांमध्ये संपत्तीवरून वाद, भांडणं करता करता पडल्या नाल्यात, व्हिडीओ व्हायरल
सैन्यदलातील पतीविषयी बोलताना पत्नीला थिएटरमध्येच अश्रू अनावर, सई मांजरेकरने शेअर केला व्हिडीओ
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now