Dhananjay Powar: ‘युट्युब’ हे मोठया प्रमाणात वापरले जाणारे अँप आहे. यावर अनेक प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. या व्हिडिओजच्या माध्यमातून ज्ञान व मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना भेटत असते. युट्युबवर जसे व्हिडीओ पाहणारे आहेत तसेच व्हिडिओ बनवून अपलोड करणारे देखील आहेत. यामाध्यमातून अनेक लोकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्युबच्या माध्यमातून काही लोकांना तर घरा-घरांत पोहोचायची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील धनंजय पोवार यातीलच एक.
मनस्थिती कशीही असुदेत पण धनंजय भाऊंचे व्हिडिओ पाहिले की मूड एकदम बदलून जातो. अगदी कमी वेळात माणूस हसून हसून बेजार होतो. धनंजय पोवार यांच ‘धनंजय पोवार डीपी’ या नावाच युट्युब चॅनेल आहे. या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ते व त्यांचे कुटुंब अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या चॅनेल वरील व्हिडिओजनी लोकांना मनभरून हसायला लावले आहे.
धनंजय पोवार व त्यांचे कुटुंब त्यांच्या युट्युब चॅनेलवर विविध फनी व्हिडिओ टाकत असतात. यामधील साधी,सोप्पी,सरळ आणि लोकांना समजणारी भाषा प्रेक्षकांना आपली वाटते. रोजच्या जीवनातील घरगुती विषय, संवादातील हजरजबाबीपणा आणि सहजता असणारे विनोद यामुळे धनंजय पोवार यांच्या व्हिडिओंना पसंती मिळते.
पोवार यांनी हे युट्युब चॅनेल १ मे २०२० ला सुरू केले होते. सध्या या युट्युब चॅनेलवर ५ लाख १७ हजार पेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. धनंजय पोवार हे युट्युबर तर आहेतच पण सोबतच ते व्यवसायिक देखील आहेत. त्यांचे स्वतःचे फर्निचरचे शोरूम व स्पोर्ट्स वेअरचे दुकानं असून व्यवसाय सांभाळत ते कंटेंट क्रिएशन देखील करत आहेत.
डीपी दादा म्हणून ओळख असणारे धनंजय पोवार स्वतःसोबत इतरांना देखील मदत करत असतात. अनेक लोकांच्या व्हिडिओमध्ये धनंजय पोवार दिसतात. डीपी दादांचे चाहते त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी दूरवरून त्यांना भेटायला सुद्धा येतात. अगदी कमी काळात धनंजय पोवार यांनी प्रसिद्धी मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Tamilnadu : तामिळनाडूच्या संघाने केला वनडेमध्ये विश्वविक्रम, तब्बल ५०० धावा ठोकत इंग्लंडला टाकले मागे
Big Boss Marathi : किरण माने घराबाहेर पडताच विकास सावंतची पलटी? अपुर्वा नेमळेकरशी सलगी करत तोंडात भरवला घास
politics: एकनाथ खडसेंचा मुलगा निखीलची आत्महत्या की हत्या? महाजनांचा धक्कादायक गौप्यस्फोट