Share

रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..

रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशियाचे सैन्य बळ खुप आधूनिक आहे. त्यांच्या सामर्थ्य, क्षेत्रफळ आणि सैन्याविषयी बोलायचे झाले तर रशिया शेजारील देशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहे. गेल्या १५ वर्षांत रशियन सैन्याचे चित्र बदलले आहे. त्यांचे सैन्य आधुनिक झाले आहे. अशा स्थितीत रशियाचा हल्ला असाच सुरू राहिला आणि युक्रेनला कोणत्याही देशाकडून मदत मिळाली नाही, तर ही लढाई रशिया एकतर्फी जिंकू शकतो. (how russia build army power)

एकेकाळी युक्रेन सोव्हिएत युनियनचा भाग होता आणि रशियाबरोबर होता. पण १९९१ मध्ये ते सोव्हिएत युनियनपासून वेगळे झाले. युक्रेनला स्वतंत्र देश म्हणून सर्वप्रथम मान्यता देणाऱ्या देशांपैकी भारत एक होता. मात्र गेल्या तीन दशकांत युक्रेन आणि रशिया यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. युक्रेनचा नाटो देशांकडे झुकणे हे एक मोठे कारण आहे.

रशिया सैन्यच्या बाबतीत अमेरिकापेक्षा मागे होता. पण त्यानंतर रशियाने त्यांची धोरणे बदलली. त्यामुळे रशियन सशस्त्र दलात भरती होणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली. तसेच तात्पुरते सैन्य आणि कायमस्वरुपीचे सैन्य वेगवेगळे करण्यात आले आणि त्यानुसार खर्च करण्यात आला. त्यांनी तांत्रितदृष्ट्याही स्वत:ला अपग्रेड केले. त्यांनी वेगवेगळी आधूनिक शस्त्रे विकत घेतली.

रशियाकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. यात एकूण ९ लाख सैनिक आणि अधिकारी आहेत, तर युक्रेनच्या सशस्त्र दलात सुमारे २.१० लाख लष्करी सैन्य आणि अधिकारी आहे, परंतु फरक असा आहे की रशियाचे सैन्य शस्त्रास्त्रे आणि आधुनिकीकरणाच्या बाबतीत युक्रेनपेक्षा खूप पुढे आहे. त्यांच्याकडे उपकरणे आहेत, अशी शस्त्रे आहेत, जी युक्रेनसोबतच अमेरिकेसाठीही खुप धोकादायक असल्याचे म्हटले जाते.

रणगाडे नेहमीच रशियन सैन्याची ताकद राहिली आहेत. जर रशियाकडे १२,४२० युद्ध रणगाडे आहेत, तर युक्रेनकडे फक्त २५९६ आहेत, ते रशियाचे तुलनेत खुपच कमी आहे. रशियाकडे लष्करी वाहनांची संख्या ३० हजारांच्या वर आहे, तर युक्रेनमध्ये ही संख्या १२,३०३ आहे.

रशियाची हवाई ताकदही खुप आहे. त्यांचे वर्चस्व संपूर्ण जगाने पाहिले आहे. रशियाकडे अजूनही ४१७३ विमाने आहेत, जी युक्रेनच्या ७७२ विमानांपेक्षा सहापट जास्त आहे. रशियाकडे ३१८ लढाऊ विमाने आहेत तर युक्रेनकडे फक्त ६० आहेत. तसेच नौदलाच्या ताफ्यातही जमीन-आसमानाचा फरक आहे. रशियाच्या नौदल ताफ्यात ६०५ जहाजे आणि ३० पाणबुड्या आहेत, तर युक्रेनकडे फक्त ३८ नौदल जहाजे आहेत आणि पाणबुड्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ सेलिब्रिटींच्या मुलांची नावं आहेत खुपच युनिक आणि मॉडर्न, तुमच्या मुलांनाही देऊ शकता अशी नावं
“देशद्रोही नवाब मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी द्या”, भाजप आक्रमक
न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकीलाने ९ वर्षे केले महिलेचे लैंगिक शोषण, पतीसोबत होते वाद

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now