तरुणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali) होय. प्राजक्ता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. प्राजक्ता कधी मराठी मालिका तर कधी चित्रपटांमध्ये काम करताना दिसते.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी मालिका ‘जुळून येती रेशीमगाठी’मध्ये मेघा देसाईच्या पात्राला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर प्राजक्ताला खो-खो, संघर्ष, हंपी, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी टिव्ही शो मध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे. त्याच्या या भूमिकेला देखील खूप प्रसिद्धी मिळत आहे. प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. परंतु, इथपर्यंत येण्यासाठी प्राजक्ता माळी केलेला संघर्ष तुम्ही माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया…
लहानपणी पासून अभिनेत्री प्राजक्ता माळीला नृत्याची प्रचंड आवड आहे. नृत्य म्हटलं की प्राजक्ताचे जिव की प्राणच. प्राजक्ताने तिचे शिक्षण पुण्यात पुर्ण केले. पुण्याच्या ललित कला केंद्रातून प्राजक्तानं नृत्याच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हि पदवी मिळवली आहे.
प्राजक्ताला नृत्याची प्रचंड आवड असल्यामुळे तिने आपलं संपूर्ण शिक्षण नृत्यातून पुर्ण केले आहे. अवघ्या १० वर्षीची असताना प्राजक्ताने नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला होता. प्राजक्ताला भरतनाट्यम खुप आवडते. प्राजक्ता नृत्य करण्याच्या बाबतीत काॅलेजमध्ये प्रथम असायची. अगदी खेळण्याबागडण्याच्या वयात प्राजक्ता स्वतः च्या पायावर उभी राहिली.
दरम्यान, प्राजक्ताच्या आईची इच्छा होती की, आपल्या मुलीने सायन्समधून शिक्षण पुर्ण करवे. परंतु, आईच्या या निर्णयाला प्राजक्ताचा पूर्णपणे विरोध होता. त्यामुळे प्राजक्ताच्या आईने तिला सांगितले की, एकतर सायन्सयधून शिक नाही तर पैसे कमाव.
यावेळी, प्राजक्ताने शाळेत डान्स क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजही ती नृत्यांगण अकॅडमी फॉर भरतनाट्यम नावानं पुण्यात क्लासेस घेते. तसेच आता तिच्या ७ शाखा असुन तिच्या या शाखा पाहण्याच काम प्राजक्ताती आई स्वतः करते. तर दुसरीकडे प्राजक्ताने आज प्रचंड प्रसिद्धी मिळाली असुन तीला मोठमोठ्या कार्यक्रम हजेरी लावताना दिसते.
महत्वाच्या बातम्या –
प्रचंड वादानंतरही प्राजक्ता माळी म्हणते ‘रानबाजारमधील ‘तो’ सीन माझ्या कारर्किदीतला बेस्ट’