Share

काय सांगता! स्विगी बॉयला असतो तब्बल एवढा पगार; पॅकेज ऐकून तुम्हीही निवडाल हा करिअर ऑप्शन

swiggy delivery boy

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. मात्र या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. तसेच या लॉकडाउनमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंटसमध्ये बसून भोजन करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र पार्सल सेवा सुरू असल्याने अनेकांना दोन वेळेचे जेवण मिळाले. (how much swiggy delivery boy earn)

लॉकडाउनच्या काळात बाहेर पडणे शक्य नव्हते, तेव्हा फक्त ऑनलाईन ऑडर करणे हाच एक पर्याय उपलब्ध होता. दररोज तुम्हाला आम्हाला ऑनलाइन फूड आणून देणाऱ्या डिलिव्हरी बॉइजचा पगार वाचून तुम्हालाही धक्का बसेल. तुम्हालाही कुतूहल वाटेल पण, ‘स्विगी’ या जपानी कंपनीचा ‘डिलिव्हरी बॉय’ (swiggy delivery boy) हा एखाद्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी इतकी कमाई करतो.

चला तर मग जाणून घेऊ या.. ‘डिलिव्हरी बॉय’ला किती पगार असतो? त्याचा पगार नेमका कसा ठरवला जातो? याचबरोबर डिलिव्हरी बॉय होण्यासाठी आवश्यक पात्रता नेमक्या कोणत्या आहेत? याची माहिती आज आपण घेणार आहोत. तसेच करियर ऑप्शन साठी या पर्यायाकडे देखील तुम्ही पाहू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय जेव्हा ग्राहकांना डिलिव्हरी देतो तेव्हा त्यांना स्विगी प्रत्येक डिलिव्हरी मागे ५ रुपये देत असते. तसेच, एका रस्त्यावरील दोन ग्राहकांना एकाच वेळी डिलिव्हरी देत असतांना, रात्री उशीर झालेला असल्यास ‘डिलिव्हरी बॉय’ला अधिक २० रुपये प्रत्येक डिलिव्हरी मागे मिळत असतात. एक डिलिव्हरी ही साधारणपणे ३० ते १२० रुपये इतकी कमाई होत असते.

तसेच पहिल्या ४ किलोमीटर प्रवासासाठी ४ रुपये आणि नंतर प्रति किमी ६ रुपये अशी प्रवास खर्च काढण्याची पद्धत आहे. वेळेनुसार ‘डिलिव्हरी बॉय’ला पैसे देण्याचं ठरवलं असेल तर ती रक्कम १ रुपये प्रति मिनिट अशी ठरवली जाते. एक डिलिव्हरी बॉय एका महिन्यात २० हजार रुपये पगार कमावतो अशी माहिती स्विगी सोबत काम करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जितक्या ठिकाणी फूड डिलिव्हरी करणार तितके अधिक पैसे तुम्हाला मिळणार असं सोपं गणित स्विगीने ठेवलं आहे. तसेच एखाद्या दिवशी तुमच्या भागातून ऑर्डर नसतील त्या दिवशी सुद्धा फुल टाईम काम करणाऱ्या व्यक्तीला ४०० रुपये प्रति दिवस दिले जातात.

जाणून घेऊ यात डिलिव्हरी बॉय होण्यासाठी आवश्यक पात्रता नेमक्या कोणत्या आहेत? तुमच्याजवळ अँड्रॉईड असलेला स्मार्टफोन असावा आणि मोबाईलमध्ये आलेला पत्ता, ऑर्डर हे वाचता आले पाहिजे हे अपेक्षित असतं. तुमच्याकडे दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असावा. त्यामुळे तुम्हीही हा करियर ऑप्शन निवडू शकता.

महत्त्वाच्या बातम्या
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यात आणि गोव्यात नेऊन..
धक्कादायक! बेरोजगार मुलं, दारूचं व्यसन, रोजची भांडणं; वैतागलेल्या आईने उचलले टोकाचे पाऊल
“अनेक संघांनी संपर्क केला, मात्र…”, शाकिबला कोणीही विकत न घेतल्यामागचे पत्नीने सांगितले ‘कारण’
चला बसुया! पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणताय, दारु पिण्याऱ्यांची ‘ही’ आकडेवारी बघून बसेल धक्का

इतर आर्थिक राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now