Share

मांसबंदी झाल्यानंतर मुस्लिम मालकाने बदलले हॉटेलचे नाव, स्टाफ आणि जेवण; म्हणाला, ‘पर्याय नाही’

यूपी सरकारने मथुरेतील मंदिर परिसरात मांसविक्री आणि मद्यविक्रीवर बंदी घातल्यानंतर, एका मुस्लिमाने केवळ आपल्या हॉटेलचे नावच बदलले नाही, तर मुस्लिम कर्मचारी बदलून हिंदू केले. यासोबतच जेवणाचा संपूर्ण मेनूही बदलण्यात आला. त्याच्या काउंटरवरचा स्टाफही बदलून बिगर मुस्लिमांना जबाबदारी दिली.

मथुराचे मुस्लिम हॉटेल मालक जमील अहमद यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कुटुंब 1974 पासून ताजमहालच्या नावाने हॉटेल चालवत होते, परंतु आता बदललेल्या परिस्थितीत ते चालवणे कठीण होत आहे. नेहमीच भीतीचे वातावरण होते. आमचा व्यवसाय चालवण्यासाठी आमच्याकडे ओळख लपवण्याशिवाय पर्याय नाही, तर हे हॉटेल आमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन आहे.

जमील यांच्या म्हणण्यानुसार, माझे वडील माझ्या आधी ते चालवत असत. परिस्थिती पाहता त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या हॉटेल ताजमहालचे नाव बदलून ‘रॉयल ​​फॅमिली रेस्टॉरंट’ केले. इतकेच नाही तर स्वादिष्ट शाकाहारी जेवण बनवताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आठ मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यांची जागा गैरमुस्लिम कारागिरांनी घेतली आहे.

जमील अहमद यांच्या म्हणण्यानुसार, आमचं चिकन कोरमा, चिकन चांगजी आणि निहारी हे पदार्थ आम्ही नॉनव्हेज हॉटेलमध्ये असताना लोकांना खुप आवडायचे. पनीर चंगेझी आणि पनीर कोरमा व्यतिरिक्त कढई पनीर, शाही पनीर आणि दाल तडका यांसारखे इतर शाकाहारी पदार्थ नव्याने बदललेल्या मेनूमध्ये बनवले जात आहेत.

जमील सांगतात की, मी सावधगिरी बाळगून कॅश काउंटरवर बसणे थांबवले, जेणेकरून कोणत्याही ग्राहकाला मुस्लिम असल्याने त्रास होऊ नये. माझ्या जागी काउंटरवर बसण्यासाठी मी गैर-मुस्लिम कर्मचाऱ्याला ठेवले आहे. आपल्या हॉटेलची ओळख बदलेले जमील म्हणाले की, त्यांना त्याच्या हॉटेलचे नाव, मेनू आणि कर्मचारी बदलण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले.

माझे उत्पन्न जे पूर्वी 15 हजार रुपये प्रतिदिन होते ते आता चार हजारांवर आले आहे. जरी त्यांनी सर्व काम नीट केले तरी काही लोकांना त्यांचे काम आवडत नाही. जमीलने खंत व्यक्त करत म्हटले की, माझ्या आयुष्यात मी मथुरासारख्या ठिकाणी कटुता पाहिली आहे. ते एक शांत मंदिराचे शहर होते.

आम्ही सलोख्याने जगलो. आता घरी मांसाहारी पदार्थ खाण्याचा विचारही करता येत नाही. त्यांच्यावर मांस खाल्ल्याचा आरोप कोणी केल्यास वाद निर्माण होऊ शकतो, अशी भीती आहे. मांस बंदीच्या विरोधात आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, मात्र ती प्रलंबित असल्याचे जलील सांगतात. त्यामुळे अधिक तोटा होऊ नये आणि हॉटेल सुरक्षित राहावे यासाठी नाव आणि यंत्रणा बदलणे चांगले.

महत्वाच्या बातम्या
भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, त्यामुळे…; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला ‘हा’ आदेश
अक्षता एकमेकांवर फेकण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये झाली हाणामारी, जाग्यावर मोडलं लग्न, वाचा सविस्तर..
IAS झाला म्हणून पुर्ण गावात वाटले पेढे, पण सत्य समोर आल्यानंतर आला हार्ट अटॅक, तुटले स्वप्न
मुंग्यांनी केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळेच देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली, खाणीत आहे २२ कोटी टन सोने

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now