महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. त्यामध्ये त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भाष्य केले होते. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. (home minister letter to mosques )
राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेतेही राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका करतान दिसून येत. भोंग्याच्या मुद्यावरुन राज्याचे राजकारण तापले असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही एक नोटीस जारी केली आहे. यात अजानच्या वेळी लाऊडस्पीकरच्या आवाजाचा स्तर किती डेसिबल असावा , हे सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटकात हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या या मागणीचे समर्थन केले होते. मात्र याच बरोबर कायद्यानुसार सगळ्यागोष्टी होईल, असेही सरकारने म्हटले होते. यानंतर कर्नाटक सरकारने सर्व मशिदींना नोटीस बजावली होती. त्यानंतर कर्नाटकात आवाज मोजणारे मशीन लावण्याची तयारीही सुरु झाली.
कर्नाटकात पोलिसांनीही यासंदर्भात कर्नाटकातील मशिदींना नोटीस पाठवल्या आहे. यात लाऊडस्पीकरचा आवाज किती असावा हे ठरवण्यात आलेले आहे. दिलेल्या डेसिबलच्या आतच आवाज असावा असे त्यांना सांगण्यात आलेले आहे.
बंगळुरु शहरातील तब्बल २५० मशिदींना अशाप्रकारची नोटीस पाठवण्यात आली आहे. या मशिदींच्या लाऊडस्पीकरचा आवाज चेक करण्यात आला होता. इथे नियमांपेक्षाही मोठा आवाज असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी तिथे असे उपकरण लावेल आहे, की दिलेल्या मर्यादेपर्यंतच आवाज वाढवता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
यापेक्षा वाईट काय? पोलिस नर्तकींचे फोटो काढतात आणि.., बार मालकांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
मुस्लिमांना हिजाबवरून भडकवणाऱ्या दहशतवादी संघटनेवर भडकले मुस्कानचे वडील, म्हणाले, माझ्या मुलीचे..
मुलीच्या जन्माचं दणक्यात स्वागत; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं घरी, व्हिडिओ तुफान व्हायरल