Share

मी घोडा नाही आमदार आहे, मला विकत घेणार पक्ष मला बघायचाय; हितेंद्र ठाकूर शिवसेनेवर भडकले

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले. (hitendra thakur angry on shivsena)

आता भाजपच्या विजयानंतर आपल्याला अपक्ष आमदारांनी दगा दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप करत थेट त्यांची नावेच वाचून दाखवली होती. त्यानंतर अपक्ष आमदार आता शिवसेनेला सुनावताना दिसत आहे.

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मी आमदार आहे घोडा नाही. मी विकण्यासाठी नाही, मला विकत घेणारा पक्ष मला बघायचाय, अशा शब्दांत हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेला सुनावले आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे.

राज्यसभेच्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार होती. त्यामुळे या निवडणूकीत प्रत्येक आमदाराचे मत खुप महत्वाचे होते, कारण त्यामुळे निवडणूकीचा पुर्ण निकाल बदलणार होता. आपला उमेदवार जिंकावा त्यासाठी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते.

राज्यसभेच्या निवडणूकीसाठी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हितेंद्र ठाकूर यांना फोन करुन पाठिंबा देण्यास सांगितले होते.

त्यानंतर जेव्हा निवडणूकीच्या निकालात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागता, तेव्हा संजय राऊतांनी मत न मिळालेल्या अपक्ष आमदारांची यादी वाचून दाखवली होती. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आमचे मते गुप्त असताना तुम्ही आमच्यावर मत न दिल्याचा आरोप कसा करु शकतात, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.

तसेच मी आमदार आहे घोडा नाही. निवडणूकीत आम्ही सर्व विजयी उमेदवारांना मतदान केले आहे. आम्हाला निवडणूकीत जेवढे उमेदवार असतील, तेवढी पसंतीची मते देता येतात. त्यामुळे उगाचच कोणावर पराभवाचे खापर फोडायचे म्हणून फोडू नका, असा टोलाही हितेंद्र ठाकूर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“१०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही”, दीपाली सय्यदांचा फडणवीसांना टोला
वेश्यांचा आदर करा, देहविक्री व्यवसायाला कायदेशीर मान्यता आणि सन्मान द्या; अमृता फडणवीसांची मागणी
अब्दुल सत्तारांनी आम्हाला मतांच्या जुळवाजुळवीसाठी फार मदत केली, भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now