Chandni chowk : बऱ्याच दिवसांपासून चांदणी चौकातील ब्रिज हा चर्चेचा विषय ठरला होता. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रार केली होती आणि ब्रिजमुळे तासंतास ट्राफिक जाम होत होते. अखेर शनिवारी रात्री हा ब्रिज जमिनदोस्त करण्यात आला. १ वाजून ७ मिनिटांनी हा ब्रिज पाडण्यात आला.
स्फोटके लावून हा ब्रिज पाडण्यात आला तेव्हा पुलाजवळ काही मिनीटे धुळीचे लोट पसरले होते. पण ६०० किलो स्फोटके वापरूनही पुल तुटला नव्हता. स्फोटात ५० टक्के पुल पडला असल्याचे सांगण्यात आलं होतं. सगळीकडे अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यानंतर पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
या पुलाबद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत. हा पुल ३० वर्षांपुर्वी बांधण्यात आला होता. त्यावेळी हा पुल बार्ली इंजिनीअर्स या कंपनीने हा पुल काही लाखांत बांधला होता. त्याचं डिझाईन PWD चं होतं. बार्ली कंपनीचे मालक अनंत लिमये आणि सतिश मराठे होते.
तेव्हा पुल उभं करणं खुप कठिण काम होतं. त्यामुळे अतिशय मेहनतीने काम करणाऱ्या टीमने हे काम उचललं होतं. या पुलाचे काम करण्यासाठी बिहारचे मजदूर होते. त्यावेळी PWD चे अधिकारी कुलकर्णी होते. ते एक प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी सुरूवातीपासूनच या कामाकडे चांगलं लक्ष दिलं होतं.
१९८२ ते २००२ साली बार्ली कंपनीने २० ब्रिज उभारले आहेत आणि त्यांचं काम करतात. खुप कमी लोकांना माहिती आहे की, आळंदी मदिंराकडे जाणारा पुलही त्यांनीच बांधला होता. दरम्यान, आता चांदणी चौकातील पाडण्यात आला आहे. रात्री उशिरा हा पुल पाडण्यात आला.
पुल पाडल्यामुळे नागरिकांची ट्राफिकची समस्या दूर होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून नागरीक याच दिवसाची वाट पाहत होते. एकनाथ शिंदेही या पुलाच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी पुल कसा पाडणार याबद्दल इंजिनीअर्ससोबत चर्चा केेली होती.
महत्वाच्या बातम्या
Shinde group: …यामुळे अंधेरी विधानसभेची जागा शिंदे गटाने भाजपला सोडली; राजकीय वर्तुळात चर्चा
Anand shinde : ..तर मी राज्यपालांवर केस करेन, गायक आनंद शिंंदे भगतसिंग कोश्यारींवर भडकले
Shivsena : ‘…त्यामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल’; घटनातज्ज्ञांचे महत्वपूर्ण विधान
Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला पाठींबा देणार का? शरद पवारांनी जाहीर केली भूमिका