Share

टपाटप! अखेर हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन, पण ‘या’ आहेत अटी

ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणात विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. १ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली. हिंदुस्थानी भाऊंवर विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप होता. (hindustani bhau released)

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते, तसेच त्यांनी काही वाहनांची तोडफोड केली होती. त्याआधी विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी देण्यात आली, त्यानंतर मुंबईतील धारावीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.

कोविड-१९ च्या काळात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. हिंदुस्थानी भाऊ त्यांच्या व्हायरल व्हिडिओंमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील एका स्थानिक वृत्तपत्रात क्राइम रिपोर्टर म्हणून कार्यरत होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी २०११ मध्ये विकास पाठकला सर्वोत्कृष्ट चीफ क्राइम रिपोर्टरचा किताबही मिळाला आहे.

आता मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठकला जामीन मिळाला आहे. ३० हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर आणि एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या १७ दिवसांपासून तुरुंगात असलेला भाऊ आता जेलमधून बाहेर येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी हिंदूस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, आंदोलनावेळी मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली होती. आंदोलनाच्या दोन दिवसांपूर्वीच स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली होती. मुंबईत जमा होणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मात्र मुंबई पोलिसांना माहिती मिळालेली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-
”माझे आव्हान पूर्ण करण्याची हिम्मत अमोल कोल्हेंच्यात नाही, त्यांना वाटतंय त्यांनी शब्द पुर्ण केला”
VIDEO: अजय देवगनचा राग पाहून घाबरले आनंद महिंद्रा, ट्विटमध्ये खुलासा करत म्हणाले..
BMW कार, स्पोर्ट्स बाईक आणि ४ फ्लॅट, पोलिसाची संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now