गेल्या काही दिवसांपासून हिंदूस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक हा खुप चर्चेत आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणात हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करत त्याची सुटका करण्यात आली आहे. (hindustani bhau on balasaheb thackeray)
१ फेब्रुवारीला हिंदूस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारीला हिंदूस्थानी भाऊची सुटका करण्यात आली आहे. आता याप्रकरणी विकास पाठकने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी हिंदूस्थानी भाऊने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही भाष्य केले आहे.
मी एका व्यक्तीला खुप मानायचो, मानतो आणि मानत राहिल, असे म्हणत हिंदूस्थानी भाऊने म्हटले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले आदर्श असल्याचे म्हटले आहे. तसेच कुणाच्या हक्कासाठी मी तुरुंगात गेलोय तर मला त्यात काही चूक वाटत नाही, असेही त्याने म्हटले आहे.
मला न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो आदेश देईल त्यावर मला विश्वास आहे. मी एका व्यक्तीला खूप मानायचो, मानतो आणि मानत राहिल, ते आहेत स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. ते देखील लाखो लोकांचा आवाज आहे. ते लोकांच्या हक्कांसाठी खुप लढले, असे हिंदूस्थानी भाऊने म्हटले आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातही खुप साऱ्या अडचणी आल्या. ते त्या अडचणींना सामोरे गेले, पण त्यांनी कधीही लोकांचा विश्वास तोडला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हक्कासाठी लढले होते, असेही हिंदूस्थानी भाऊने बोलताना म्हटले आहे.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे आदर्श आहे. मी त्यांच्याकडून शिकलो. कुणाच्या हक्कासाठी लढायला मी इथं आलोय आणि तुरुंगात गेलोय, तर मी काही चूक केलीय, असं मला वाटत नाही. मी त्यांचा शिवसैनिक आहे आणि त्यांच्याच पावलावर चालतो, असेही हिंदूस्थानी भाऊने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आघाडीतच बिघाडी! काँग्रेसने शिवसेनेवर लावला तब्बल ५०० कोटींच्या घोटाळ्याचा खळबळजनक आरोप
मुंबईच्या ‘या’ साध्या रेस्टॉरंटमध्ये अंबानी कुटुंबीय घेतात जेवणाचा आस्वाद, नाव वाचून अवाक व्हाल
पोतंभर नाणी घेऊन स्कुटर घेण्यासाठी पोहोचला, सुट्टे पैसे मोजून कर्मचाऱ्यांना फुटला घाम, वाचा पुढं काय घडलं..