हिंदू संघटनांनी आज दिल्लीतील कुतुबमिनार परिसराजवळ हनुमान चालिसाचे पठण केले. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ ठेवावे, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी तिथे हनुमान चालिसाचे पठण केले आहे. (hindu-organization want vishnu stambh)
कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ करण्याचे आवाहन संयुक्त हिंदू आघाडीकडून करण्यात आले आहे. युनायटेड हिंदू फ्रंटने असा दावा केला आहे की कुतुबमिनार हा एक विष्णू स्तंभ आहे. २७ जैन आणि हिंदू मंदिरे पाडून हा हा कुतुबमिनार बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे नाव आता विष्णूस्तंभ ठेवा.
युनायटेड हिंदू फ्रंटने कुतुबमिनार संकुलात जैन आणि हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींचे नूतनीकरण करून हिंदूंना येथे पूजा करण्याची परवानगी द्यावी. तसेच यावेळी त्यांनी परिसरात हनुमान चालिसाचे पठण करुन विष्णूस्तंभ घोषित करण्याची मागणी केली आहे.
या वेळी संयुक्त हिंदू आघाडीचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष जय भगवान गोयल उपस्थित होते. त्याआधी दिल्ली न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला पुढील आदेश येईपर्यंत कुतुबमिनार संकुलातून गणेशाच्या दोन मूर्ती हटवू नयेत असे आदेश दिले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निखिल चोप्रा यांनी आपल्या आदेशात पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत यथास्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, कुतुबमिनारच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विश्वू हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं होतं की, कुतुबमिनार हा प्रत्यक्षात विष्णूस्तंभ आहे. २७ जैन आणि हिंदू मंदिरे पाडून त्यातील सामग्रीच्या माध्यमातून हा कुतुबमिनार बांधण्यात आला आहे. याची सुपरइम्बोइड रचना केवळ हिंदू समाजाला डिचवण्यासाठी बनवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तसेच विश्व हिंदू परिषदेने शनिवारी मागणी केली होती की, सरकारनं कुतुबमिनार परिसरातील प्राचीन मंदिराचं पुननिर्माण करावं, तसेच हिंदू परंपरेनुसार इथे प्रार्थना पुन्हा सुरु करण्याची परवानगी द्यावी. बन्सल यांच्यासोबत विश्वू हिंदू परिषदेच्या नेत्याच्या एका गटाने या परिसराचा दौराही केला होता.
महत्वाच्या बातम्या-
अशी धरपकड मोहिम राज्य सरकारने कधी मशिदींमधील शस्त्रास्त्रे शोधण्यासाठी राबवली का? राज ठाकरे भडकले
सामना KKR ने जिंकला पण चर्चा मात्र बुमराहचीच, फक्त १० धावा देत घेतल्या ५ विकेट्स
श्रीलंकेत हिंसाचार वाढला, नागरिकांनी जाळले पंतप्रधान-खासदारांचे बंगले; एका खासदाराचा मृत्यू