अमेरिकेची रिसर्च फर्म हिंडनबर्गने प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना चांगलाच धक्का दिला आहे. त्यांनी अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रुपचे शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली कोसळल्या आहे.
तसेच शेअर्सच्या किंमती सातत्याने खाली जात आहे. एका अहवालानुसार तर अदानी ग्रुपला यामुळे ५.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रुपच्या इतके मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे हिंडेनबर्ग कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे.
हिंडनबर्गने फक्त अदानीच नाही तर याआधीही अनेक कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहे. अशाप्रकारचे रिसर्च करुन ही कंपनी कोट्यवधी रुपये कमवते. आता ती कंपनी इतके पैसे कमवते तरी कसे? हेच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हिंडनबर्ग कंपनी ही शॉर्ट सेलिंग कंपनी आहे. ती एक गुंतवणूक कंपनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने सांगितले आहे की, ती एक शॉर्ट सेलिंग कंपनी आहे. कमी किंमतीत शेअर विकत घेणे आणि किंमत जास्त झाल्यावर ते विकणे असा कंपनीचा फॉर्म्युला आहे.
शॉर्ट सेलर कंपनी ज्या कंपनीवर लक्ष केंद्रीत करते त्या कंपनीबद्दल गुंतवणूकदार चिंता व्यक्त करतात. कारण त्या कंपनीच्या डोक्यावर जास्त कर्ज असण्याची किंवा त्या कंपनीने गैरव्यवहार केल्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांचे शेअर्सच्या किंमती कमी होतात आणि याचा शॉर्ट सेलिंग कंपन्यांना फायदा होतो.
हिंडनबर्गने अमेरिकेतील अदानी कंपनीच्या बाँड्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतली असून त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतल्यानंतर हिंडनबर्गने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले आहे.
हिंडनबर्ग जेव्हा एखाद्या कंपनीला लक्ष्य करते तेव्हा तिचे शेअर्स घसरतात. त्यामुळे ती कंपनी ते शेअर्स विकत घेते आणि नफा कमवते. हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानींचे शेअर्स तब्बल २५ टक्के घसरले आहे. २०२० मध्ये या कंपनीने २० कंपन्यांचे अहवाल प्रसिद्ध केले होते.
अहवालांमुळे तब्बल १६ कंपन्यांचे अहवाल सरासरी १५ टक्क्यांनी घसरले होते. निकोला, स्क्वॉक्स, जिनियस ब्रँड, आयडियानॉमिक, विन्स फायनान्स, एससी वॉक्स, एचएफ फुड, ब्लुम एनर्जी, अफ्रिया, ट्विटर इंक या कंपन्यांचे अहवाल हिंडनबर्गने सादर केले होते. त्यामुळे त्यांचे शेअर्स कोसळले होते.
महत्वाच्या बातम्या-
रील्समुळे रातोरात ऊसतोड दाम्पत्य बनलं स्टार; पण प्रसिद्धी मिळताच धक्कादायक व्हिडीओ आला समोर
‘अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका’; संभाजी भिडेंचे सरकारला आवाहन
महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे नेते मानस पगार यांचे अपघाती निधन; सर्वपक्षीय तरूण हळहळले