Share

फिरायला गेल्यावर बिकीनी घालणाऱ्या अभिनेत्रीने रमजान सुरु होताच घातला बुरखा; फोटो झाले तुफान व्हायरल

बॉलिवूडमधले असो वा सिरियल्समधले, सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या लूकमुळे चर्चेत येत असतात. अनेक अभिनेत्री बिकीनी घालून फोटो पोस्ट करताना दिसतात. तसेच हॉट लूकमध्ये फोटो पोस्ट करताना दिसतात. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे हिना खान. (hina khan burkha viral photo)

हिना खान तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा बोल्ड फोटो शेअर करताना दिसून येते. आताही ती चर्चेत आली असून त्याचे कारण मात्र जरा वेगळे आहे. कारण यावेळी ती एखाद्या बिकीनीमध्ये नाही तर बुरख्यात दिसून आली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

सध्या पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. हा महिना इस्लाममध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात प्रत्येक मुस्लिम नमाज वाचतो आणि उपवास देखील ठेवतो. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसोबतच अनेक मुस्लीम स्टार्सही रमजान महिन्याचे खास स्वागत करत आहेत.

आता अभिनेत्री हिना खाननेही रमजान महिन्याची सुरुवात एका खास पद्धतीने केली आहे. आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी बोल्ड आणि ग्लॅमरस हिना खान रमजानच्या पवित्र महिन्याच्या सुरुवातीला बुरखा घातलेली दिसून आली. हिना खानने तिच्या सोशल मीडियावर काळ्या बुरख्यातील फोटो पोस्ट केले आहेत.

 

हिना खानचे हे फोटो लोकांना खूप आवडले आहे. एका फोटोमध्ये हिना खान तिच्या आईसोबत दिसत आहे. हिनाची आई देखील काळा बुरखा आणि काळ्या सनग्लासेसमध्ये दिसत आहे. हिना खानचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो नेहमीच चाहत्यांना आवडत असले तरी या काळ्या बुरख्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

फोटो शेअर करताना हिनाने लिहिले की, ‘रमजान मुबारक’, या फोटोंना लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत आणि रमजानच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तर एका व्यक्तीने लिहिले की तुम्ही खूप सुंदर दिसताय.तर काहींनी यावेळीही तिला ट्रोल केले आहे. लोकांना हिनाला बोल्ड फोटोंमध्ये आणि बिकीनी घातलेल्या फोटोंमध्ये बघण्याची सवय झाल्यामुळे एकाने तिला ओळखण्यास नकार दिला आहे. हि अभिनेत्री कोण आहे? असे एकाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
इंधनाचे दर वाढवणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले
मोदींच्या गुजरातमध्ये आपचे ‘इतके’ उमेदवार निवडणूक येणार, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now