सध्या कर्नाटकातील हिजाब वादावरून देशभरात चर्चा चालू आहे. हिजाब वादामुळे देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी त्याचे पडसाद आंदोलन केली जात आहेत. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. (hijab row udupi bjp mla says he gets threat calls)
उडप्पी जिल्ह्यातील कुंदापूर येथील हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्या पासून या वादाला तोंड फुटले. त्याचसोबत त्यांना भगवी शाल अंगावर ओदुन काही लोकांनी त्रास दिला. यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर उडुपीचे भाजपा आमदार के रघुपती भट यांनी खळबळजनक दावा केला आहे. हिजाबच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत आहेत, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकात हिजाबच्या वादाचं उगमस्थान असलेल्या उडुपी येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर वुमनच्या विकास समितीचे अध्यक्ष असलेले भट यांना आलेले बहुतेक कॉल हे परदेशातून आलेले इंटरनेट कॉल्स असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच याच प्रकरणी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘लोकांनी काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण?’ असा सवाल आव्हाड यांनी केंद्र सरकारला केला आहे
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘लोकांनी काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण त्यापेक्षा केंद्र मध्ये एक मंत्रीच करा, मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असे खाते सुरु करा, त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील असा टोला हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला.
तसेच आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतो. त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असा टोला आव्हाड यांनी शिवसेना नेत्यांना लगावला. यामुळे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
..आणि मिठी मारून दीर भावजयीने भररस्त्यात सोडला जीव, सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरले
वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव; वाचा नक्की काय घडलं?
कंगना राणावत ‘गेहराइयां’ चित्रपटाला म्हणाली ‘कचरा’, पोर्नोग्राफी चित्रपटांशी केली तुलना
पाँडिचेरी: स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी चित्रपट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला