Share

कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात; मुंबई, मालेगावात मुस्लिम तरुण-तरुणी रस्त्यावर

सध्या कर्नाटकच्या शाळा कॉलेजमध्ये बुरखा प्रकरणावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा-कॉलेजात बुरखा घालून येण्यासाठी विद्यार्थीनी आंदोलन करत आहे. या प्रकरणाचे पडसाद देशभरात पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रातही अनेक आता मुस्लिम संघटनांनी या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. (hijab impact on maharashtra)

औरंगाबादमधील मुस्लिम तरुणींनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षण घेणं आमचा अधिकार असून अशाप्रकारे हिजाबवरुन टार्गेट करणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर बीडमध्ये पहले हिजाब, फिर किताब, अशी बॅनरबाजी सुरु आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणाहून हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आहे. अनेक मुस्लिम संघटना या रस्त्यावर उतरल्या आहे. मुंबईत हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला उतरल्या असून मुस्लिम संघटनांनकडून सह्यांचं कॅम्पेन सुरु आहे. देशात पाच राज्यात निवडणूका होत असून या पार्श्वभूमीवर राजकारण केलं जात असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी म्हटलं आहे. तसेच यात इतका मोठा वाद घालण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीही मैदानात उतरले आहे. कर्नाटक सरकारकडून राज्यघटनेची पायामल्ली सुरु असल्याचा आरोप ओवेसींनी केला आहे. तसेच यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध केला आहे.

कोणतेही सरकार हे ठरवू शकत नाही, की आम्ही काय खायचं आणि कोणते कपडे घालायचे. कर्नाटकात भाजप सरकार ओवेसींविरोधात काम करत आहे. विद्यार्थीनींना महाविद्यालयात हिजाब घालण्यापासून रोखलं जात आहे. या निर्णयाचा आपण निषेध करतो, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

तसेच मालेगावमध्ये मुस्लिम महिला हिजाबच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहे. प्रांतधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि महिला सेलनं मोर्चा काढला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे.

आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेत मालेगावच्या सुपरमार्केटमध्ये परीसरातून रॅली काढली. सरकारने ड्रेसकोड रद्द करावा आणि हिजाब व बुरख्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. महाराष्ट्रातसह इतर राज्यातही असे आंदोलन सुरु झाले आहे, त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
अल्लू अर्जुनचा चित्रपट बकवास, मनोरंजनाच्या नावाखाली मुर्खपणा; पद्मश्री गरिकापती नरसिंह निर्मात्यांवर संतापले
लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून लाडक्या नातीने केली प्रार्थना; मंदिरातील फोटो झाले व्हायरल
टाटा आता शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! कांदा साठवणुकीसाठी विकसित केले स्मार्ट सोलुशन

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now