मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे पुन्हा चर्चेत आले आहे. सध्या परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी राज्य सरकारनेही आपली भूमिका मांडत तपासासाठी राज्याची संमती आवश्यक असल्याचे म्हटले आहे. (highcourt angry on sanjay raut)
अशात सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा अप्रत्यक्षपणे दाखलाच दिला आहे. तुमच्या अशा वक्तव्यांची जागा केराच्या टोपलीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमुर्ती संजय किशन कौल आणि न्यायमुर्ती एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींनी संजय राऊतांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीनं असं वक्तव्यं केलं की, त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. पण अशा गोष्टीमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराच्या टोपलीत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर म्हणजेच श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती. त्यांच्या ११ ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
ही राक्षसी हुकूमशाही आहे. सध्याच्या वातावरणात न्यायालयांकडून न्यायाची अपेक्षा नाही, असे विधान संजय राऊतांनी केले होते. तसेच असं केल्यानं इथलं सरकार पडेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही लढत राहू, असेही संजय राऊतांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: लहान मुलाने तब्बल 5 फुटांच्या सापाशी घेतला पंगा, व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप
मुलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा, भाजीत झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि..
आधी अस्वस्थ वाटलं मग उलट्यांचा भयंकर त्रास; सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का