भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी खूप वेगाने वाढत आहे आणि त्याच वेगाने नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि स्कूटर देखील लॉन्च होत आहेत. यावर्षी टॉर्क, कोमाकी, सायबोर्ग आणि ओबेन सारख्या नवीन कंपन्यांनी उत्तम बॅटरी रेंज असलेल्या इलेक्ट्रिक बाइक्स लाँच केल्या आहेत. (hero splendor electric version launch)
आता लोक हिरो स्प्लेंडरच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटची कल्पना करू लागले आहेत, जी भारतात सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल आहे. आजपर्यंतचा विचार केला असता, Hero MotoCorp या देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या दुचाकी कंपनीने आपला इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड विदा लाँच केला होता. तसेच Splendor Electric देखील आगामी काळात लॉन्च केले जाईल असे म्हटले जात आहे.
ज्या प्रकारे इलेक्ट्रिक वाहनांसाठी वातावरण तयार केले जात आहे, ते पाहता हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपनीसाठी या विभागात प्रवेश करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. हिरो स्प्लेंडर ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाइक आहे, जी तिच्या लुक आणि फीचर्स तसेच मायलेज बाबत सामान्य लोकांची आवडती बाइक आहे.
अशा परिस्थितीत जर हिरोने आपल्या नवीन EV ब्रँडच्या बॅनरखाली हिरो स्प्लेंडर बाईक लाँच केले तर तो एक मास्टरस्ट्रोक असेल. ही देशांतर्गत कंपनी इतर सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्सना एका फटक्यात मात देऊ शकते. मात्र, आगामी काळात हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रीक किंवा विदाची पहिली इलेक्ट्रिक बाईक कधी लॉन्च केली जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
रशलेनच्या रिपोर्टनुसार, जर हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक आगामी काळात लॉन्च झाली तर त्याची बॅटरी रेंज २४० किमी पर्यंत असू शकते. तसेच या बाईकचे अनेक प्रकार असू शकतात, ज्यामध्ये सर्वात स्वस्त व्हेरियंटची बॅटरी रेंज १२० किमी असू शकते. आगामी स्प्लेंडर इलेक्ट्रिकचा टॉप स्पीडही चांगला असेल आणि त्यात अनेक फीचर्सही असतील. ऑटोमोटिव्ह डिझायनर विनय राज सोमशेकर यांनी हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिकचे डिजिटल रेंडर जारी केले आहे.
दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगूया की, गेल्या वर्षी GoGoA1 नावाच्या मुंबईतील कंपनीने हिरो स्प्लेंडरसाठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट लाँच केले होते, ज्याची किंमत ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त होती. हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक कीटची बॅटरी रेंज १५१ किमी पर्यंत आहे आणि ३ वर्षांपर्यंतची वॉरंटी आहे. तसेच हिरोच्या बाईकची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत असू शकते असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
आजची सावित्री! बिबट्याच्या जबड्यातून वाचवला पतीचा जीव; अहमदनगरच्या महिलेचं राज्यभरात होतंय कौतुक
बायकोशी भांडण झाल्यावर नवऱ्याची झाली वाईट अवस्था, विमानतळावर जगतोय ‘असे’ आयुष्य
राजामौलींच्या RRR ने घडवला इतिहास, चौथ्या दिवशीही केली इतक्या कोटींची छप्परफाड कमाई