अभिनेते आणि अभिनेत्री वेगवेगळ्या कारणावरून सोशल मिडियावर चर्चेत असतात. अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते. नृत्यांगना हेमांगी कवी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतीच हेमांगी कवी हिने एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. अप्रत्यक्षारित्या तिने सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींनाच लक्ष केलं आहे. तिच्या या पोस्टची आता राजकीय वर्तुळासह राज्यात देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असे हेमांगीने आपल्या पोस्टमधून म्हटले आहे. मात्र हेमांगी कवी हिने पोस्टनंतर चाहत्यांना एक चकवा देखील दिला आहे. कवीने या पोस्टनंतर तिच्या आगामी चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘तमाशा Live’ या चित्रपटातील आहे.
दरम्यान, येत्या १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हाच खरा हाय वाघ ! असे या गाण्याचे बोल आहे. यामुळे हेमंगीने अगदी खरमरीत शब्दात सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय नट्यावर भाष्य केलं आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस देखील पडत आहे.
तर दुसरीकडे, सध्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे बीडच्या शेतकरी पुत्राने राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सत्तास्थापनेच्या घडामोडींना देखील वेग आला आहे.
शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे परत या म्हणणाऱ्या शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; वाचा नक्की काय घडलं?
‘मुख्यमंत्र्यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला, राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’; शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे आरोप
जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे आक्रमक
“पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”; शिवसेनेचा निर्धार