Share

आरोग्य मंत्रालयाकडून झाली मोठी चुक, कोव्हिड लिंकऐवजी ट्विट केली पॉर्न लिंक

mobile

कोविड काळात नागरिकांना माहिती देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने महत्वाची भूमिका बजावली होती. आरोग्य मंत्रालयाकडून जनहिताची माहिती दिली जात होती. असे असताना आता कॅनडामधून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (helth ministry share porn link)

आरोग्य मंत्रालयाकडून जनहितासाठी माहिती देणं आवश्यक असते. पण एका मंत्रालयाने ट्विटवरुन माहिती देत असताना चक्क पॉर्न वेबसाईटची लिंकच शेअर केली आहे. झालेली ही चुक लक्षात येताच मंत्रालयाने हे ट्विट डिलीट केले आहे. कॅनेडातील क्युबे मंत्रालयाकडून अशी चुक झाली आहे.

मंत्रालयाकडून झालेल्या या चुकीमुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पॉर्न लिंक शेअर केल्यामुळे अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. कोव्हिड पोर्टलची लिंक पेजवरुन शेअर करत असतानाच, चुकून ट्विटर हँडलवरुन पॉर्न हब या पॉर्नच्या वेबसाईटची लिंक शेअर करण्यात आली होती. ज्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

तसेच जेव्हा आरोग्य विभागाला चूक लक्षात आली, त्यानंतर त्यांनी तातडीने ते ट्विट डिलीट केले. या सर्वप्रकारानंतर आरोग्य विभागावर जोरदार टीका झाली. पण त्यानंतर आरोग्य विभागाने याप्रकरणी स्पष्टीकरण देत नागरिकांची माफी मागितली आहे.

आमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या परिस्थितीमुळे आमच्या ट्विटर हँडलवरुन अयोग्य कंटेंटची लिंक पोस्ट करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने एएफपी या वृत्तसंस्थेला पाठवलेल्या मेलमध्ये स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाकडून झालेल्या या चुकीमुळे नेटकरी संतापले आहे. या चुकीमुळे अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. एवढी गंभीर चुक आम्हाला आमच्या सरकारकडून अपेक्षित नाही. तसेच लिंक शेअर करताना डोकं गहाण ठेवून काम करतात का? असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
न्यायदेवतांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असून त्या पट्टीला एक छिद्र आहे अन्..; संजय राऊतांचे रोकठोक विधान
मोठी बातमी! आशा भोसलेंचा मुलगा अचानक झाला बेशुद्ध, दुबईच्या हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
VIDEO: बापू तु आया और मुझे ले गया, धोनीचे बोलणे ऐकून अक्षर पटेल ढसाढसा रडला होता, वाचा किस्सा

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now