शब्दांऐवजी इमोजीच्या रूपात भावना व्यक्त करताना अनेक तरुण तरुणी दिसून येत असतात. पण यासंबंधी एक कायदाही आला असून या नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे. रोज व्हॉट्सऍपवर इमोजी पाठवण्याचा ट्रेंड सर्रास सुरू आहे, त्यामुळे सौदी अरेबियाने हा कायदा बनवला आहे. (heart emoji punishment)
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, करोडो लोकांनी त्यांच्या जोडीदाराला किंवा मित्रांना रेड हार्ट इमोजी पाठवले असतील. फेसबूकवरील पोस्टला प्रतिसाद म्हणून हार्ट इमोजी वापरला लोकांना खुप आवडते. पण जर तुम्ही पाश्चिमात्य देशांव्यतिरिक्त सौदी अरेबियात असाल तर हा रेड हार्ट इमोजी तिथल्या कुणालाही पाठवण्यापासून परवानगी नाहीये.
खरे तर या देशात सायबर कायदे खूप कडक आहेत. येथे तुमच्या कुटुंबाला किंवा जोडीदाराला रेड हार्ट इमोजी पाठवल्यास तुरुंगवास होऊ शकतो. तसेच याच गुन्ह्यासाठी तुम्हाला २० लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो. तर विशेष परिस्थितीत दोघांना दोन वर्षे कारावास आणि वीस लाखांचा दंड होऊ शकतो. मात्र, हे तेव्हाच घडेल जेव्हा हा मेसेज प्राप्त करणारा पोलिसांकडे तक्रार करेल.
सौदी सायबर एक्सपर्ट म्हणतात की, सौदी कायद्यानुसार दोषी आढळल्यास त्याला दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय पाठवणाऱ्याला एक लाख सौदी रियालचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. सौदीमध्ये रेड हार्ट इमोजी पाठवणे त्रासदायक कायद्याखाली ठेवण्यात आले आहे.
GulfNews.com या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सौदी अरेबियातील अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोअताज कुत्बी म्हणतात की, व्हॉट्सऍपवर रेड हार्ट इमोजी पाठवणे हा गुन्हा आहे. त्यांनी सांगितले की जर प्राप्तकर्त्याने ऑनलाइन चॅटिंग दरम्यान फोटो किंवा इमोजीवरुन केस दाखल केली तर हा छळ गुन्ह्याच्या श्रेणीत येईल.
तसेच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना कोणत्याही दोन लोकांच्या संभाषणात बळजबरीने हस्तक्षेप करू नये किंवा भावना दुखावणारे फोटो किंवा इमोजी शेअर करू नये असा कडक इशाराही दिला आहे. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी समोरच्या व्यक्तीच्या भावना जाणून घेतल्याशिवाय रेड हार्ट इमोजी पाठवणे टाळावे.
महत्वाच्या बातम्या-
निया शर्मा हॉट अदा पाहून चाहते झाले घायाळ, डीपनेकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, पहा फोटो
पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरू होतेय नवीन बुधवार पेठ, समोर आला मोठा घोटाळा
अभिनेता दीप सिद्धूचा अपघात की हत्या? पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा दुआ