Share

मी जेव्हा तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा.., हर्षल पटेलची बहिणीसाठी भावूक पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याची मोठी बहीण अर्चिता पटेलसाठी एक भावनिक पत्र लिहिले आहे. अर्चिता पटेलचे गेल्या शनिवारी ९ एप्रिल रोजी निधन झाले. या दुःखद घटनेनंतर हर्षल पटेल काही दिवसांसाठी आरसीबी टीमचा बायो-बबल सोडून त्याच्या घरी गेला. यामुळे तो 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धचा सामना खेळू शकला नाही.

त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हर्षल पटेलची उणीव भासली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हर्षल पटेल नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या बायो-बबलमध्ये परतला. तो १६ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि संघाच्या विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर भावूक हर्षल पटेलने त्याच्या दिवंगत बहिणीसाठी त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आयपीएल सुरू होण्यापूर्वी बहिणीसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. हर्षल पटेलने आपल्या बहिणीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

त्याने पोस्टमध्ये लिहीले आहे की, ‘दीदी, तू आमच्या आयुष्यातील सर्वात उदार आणि आनंदी व्यक्ती होतीस. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन तुम्ही अविश्वसनीय अडचणींचा सामना केला. जेव्हा मी तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तुम्ही मला खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते आणि माझी काळजी करू नको असं सांगितलं होतं.

या शब्दांमुळेच काल रात्री मी मैदानात परत येऊ शकले. हर्षलने पुढे लिहिले की, आता मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आणि सन्मान देण्यासाठी एवढेच करू शकतो. तुला माझा अभिमान वाटेल ते सर्व मी करत राहीन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या आणि वाईट क्षणाला मला तुमची आठवण येईल.

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आत्म्याला शांती लाभो, अशी भावनिक पोस्ट हर्षल पटेलने केली आहे. त्याची ही भावनिक पोस्ट वाचून चाहतेही भावूक झाले आहेत आणि अनेकांनी हर्षलला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर हर्षल पटेलला त्याच्या बहिणीच्या मृत्यूची माहिती मिळाली. आयपीएलचे मागील दोन हंगाम हर्षल पटेलसाठी चांगलेच गेले. डेथ ओव्हर्समध्ये तो प्रभावी गोलंदाजी करतो.

महत्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! भोंग्यांबाबत आता राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, पोलीस प्रमुखांना दिले ‘हे’ आदेश
‘मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावरून धर्मा-धर्मात दुही’, भाजपच्या मुंडेंनी स्वपक्षालाच सुनावले
१७ वर्षात नाशिक शहरात भोंग्यांसाठी परवानगीच घेतली नाही, पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
धोकादायक कॉम्बिनेशन! अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ पाच गोष्टी, शरीरावर होईल गंभीर परिणाम

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now