मुलाच्या जन्मानंतर प्रसिद्ध कॉमेडीअन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळेच कामातून ब्रेक घेतल्यानंतर या जोडप्याने छोट्या ट्रिपचा बेत आखला. भारती-हर्ष यांचा मुलगा गोलाची ही पहिलीच ट्रिप आहे. (harsh want divorce from bharati singh)
अनेकांना प्रश्न पडला होता की कॉमेडी क्वीन भारती आपल्या मुलासोबत पहिल्यांदा कुठे गेली आहे? पण मनावर जास्त ताण देऊ नका. भारती कुठे गेली आहे? तेच आपण जाणून घेणार आहोत. तसेच हर्षने भारती सिंगकडे घटस्फोटाची मागणी का केली हेही आपण जाणून घेणार आहोत.
भारती आणि हर्ष हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात गोंडस जोडपे आहेत. लोकांना कसे हसवायचे हे त्यांना माहित आहे. तसेच त्यांच्या गोष्टी ते अनेकदा उघडपणे शेअर करत असतात. अशात या जोडप्याने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मुलाच्या पहिल्या प्रवासाचा ब्लॉग चाहत्यांशी शेअर केला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला, भारती या ठिकाणाच्या नावाबद्दल खूप सस्पेंस निर्माण करते. घरातून बाहेर पडल्यानंतर ती विमानतळावर पोहोचते. त्यानंतर ती त्या ठिकाणी दिसते. जिथे गोलासह त्यांना पोहोचायचे असते. गोलासोबत भारती आणि हर्ष गोव्यात पोहोचले आहेत.
गोव्यात ते सध्या अॅडमो द बेलस रिसॉर्टमध्ये राहत आहे. हे तेच रिसॉर्ट आहे जिथे हर्ष आणि भारतीचे लग्न झाले होते. रिसॉर्ट कलंगुट आणि बागा बीच जवळ आहे. भारती आणि हर्ष यांनी विचार केला की गोलाची पहिली ट्रिप अशा ठिकाणी असावी, जिथून त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती.
ट्रिपचा व्हिडीओ शेअर करताना भारतीने हेही सांगितले की, तिची घरातील हेल्पर आणि तिच्यात खुप भांडण होतात. घरातील मदतनीस आणि भारती यांच्यावर हर्ष नाराज होता. त्यामुळे त्याने मस्करीत थेट भारतीकडे आणि त्या हाऊस हेल्परकडे घटस्फोटाचीच मागणी केली आहे.
आता त्याला घरातील आणखी एका महिलेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच मला या दोघांकडून घटस्फोट हवा आहे, मी यांना खुप वैतागलोय, असे हर्ष सांगताना दिसत आहे. भारतीचा व्हिडिओ खूप मजेदार आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका
वानखेडे अडकले! गृहमंत्री म्हणाले, चुकीच्या पद्धतीने निष्पाप व्यक्तीला अडकवणाऱ्यावर कारवाई…
‘माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, पण…; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ