Share

सामाजिक बंधने झुगारत बुलढाण्याच्या पठ्ठ्याने ठेवला नवा आदर्श, विधवा भावजयीसोबत केलं लग्न

आजचे जग कितीही पुढे गेलेले असले तरी काही रुढी परंपरा या अजूनही समाजाला मागे खेचताना दिसून येतात. समाजात विधवा महिलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही काही ठिकाणी बदललेला दिसत नाही. अनेकदा त्या महिलेला चुकीची वागणूकही दिली जाते. (haridas damdhar married sister in law)

अशात बुलढाणा जिल्ह्यातून एक प्रकार समोर आला आहे, जो खरंच कौतूकास्पद आहे. वानखेड गावातील एका तरुणाने विधवा महिलेकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. त्याने आपल्याच विधवा भावजयीसोबत लग्नगाठ बांधत संसार थाटला आहे. या लग्नातून त्याने समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

आजारामुळे त्या महिलेच्या पतीचा मृत्यु झाला होता. महिलेचे नाव नंदा दामधर असे आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. अचानक पती गेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशात पती नसल्यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला होता.

अशावेळी हरिदास दामधर पुढे आला. त्याने सर्व सामाजिक बंधने झुगारली आणि आपल्या विधवा भावजयीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाला घरच्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे त्या दोघांनी आता लग्न केले आहे.

विधवा भावजयीसोबत लग्न करण्याचा निर्णय हरिदासने घेतल्यानंतर कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला. लग्नाच्यादिवशी वऱ्हाडी मंडळींनी टाळ्यांचा गजरात नवरीचे स्वागत केले. तसेच त्यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे आता या दाम्पत्याने मुलांसह सुखाने संसार करण्यास सुरुवात केली आहे.

पती गेल्यामुळे नंदा दामधर एकट्या पडल्या होत्या. तसेच त्यांना एक मुलगा आणि मुलगीही आहे. पण वडिलांचे छत्र नसल्यामुळे त्यांना मुलांच्या भविष्याची चिंता होती. अशावेळी नातेवाईकांनी आणि कुटुंबाने हरिदासला भावजयीसोबत लग्न करण्यावर विचार कर असे सांगितले. परिस्थिती पाहता त्यानेही लग्नाला होकार दिला आणि हे लग्न धुमधडाक्यात पार पडले.

महत्वाच्या बातम्या-
समुद्रात वाहून आलेल्या ‘सोनेरी रथाचे’ रहस्य झाले उघड; माहिती वाचून चकीत व्हाल
मोठा धक्का! मुंबईने ९७ धावांवरच चेन्नईला ऑलआऊट करत जिंकला सामना, चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं
येतोय ‘मिर्झापूर 3’! गुड्डू भैया म्हणतो यावेळी लाठ्याकाठ्या नाही तर बूट अन् बंदूकांनी फायर होणार

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now