Share

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला भलेमोठे खिंडार; हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा

hardik patel

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पटेल आणि काँग्रेस नेत्यांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या. दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या सर्व चर्चानंतर आज अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

याचबरोबर या वर्षीच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पटेल नाराज असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. यामुळे कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे.

ट्विट करत हार्दिक पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. हार्दिक पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पाऊलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.’

दरम्यान, अलीकडे अनेकदा हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसवर नाराज असल्याच दाखवून दिलं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस नेता हा उल्लेख काढून टाकला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. याचबरोबर पटेल यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचा उल्लेख केला होता.

सोबतच हार्दिक पटेल यांनी याबद्दल भाजपचं तोंडभरून देखील कौतुक केलं. तेव्हापासून पटेल यांच्याबद्दल पक्षांतराबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज हार्दिक पटेल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मात्र आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कोणतीही माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या
राज्यसभेसाठी भाजपने तिसरी जागा लढवण्याची केली खेळी; संभाजीराजेंची वाट आता भाजपनेच अडवली
नागपूरमध्ये पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, म्होरक्याचे नाव ऐकून पोलिसही हादरले
मालकासाठी तीन गोळ्या खाल्ल्या, ४० किलोमीटर गाडी चालवून मालकाला रुग्णालयातही पोहोचवलं पण पुढे मात्र…
सरकारने ताजमहाल आणि कुतूबमिनार लवकरात लवकर हिंदूंच्या ताब्यात द्यावे; चक्क काॅंग्रेस नेत्याची मागणी

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now