‘जेव्हा जेव्हा मी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना भेटलो, तेव्हा त्यांना गुजरातच्या समस्या सांगितल्या. मात्र त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समस्या ऐकण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त होते. जेव्हा जेव्हा देश संकटात सापडला. तेव्हा काँग्रेस नेते विदेशात होते,’ अशी खरमरीत टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पटेल आणि काँग्रेस नेत्यांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या.
दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या सर्व चर्चानंतर आज अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. ट्विट करत हार्दिक पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हार्दिक पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पाऊलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.’
दरम्यान, जाता जाता हार्दिक पटेलांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. ‘काँग्रेस पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणापुरती मर्यादित राहिल्याचं गेल्या तीन वर्षापासून मी पाहत आहे. देशातील लोकांना केवळ विरोध नकोय,’ अस हार्दिक पटेल यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
तसेच पुढे पटेल म्हणतात, ‘नागरिकांना देशाच्या भविष्याबाबत विचार करणारं नेतृत्व हवं आहे. अयोध्येतील राम मंदिर असो, कलम 370 हटवण्याचा विषय असेल अथवा जीएसटीचा निर्णय असेल, या सर्व विषयावर नागरिकांना तोडगा हवा होता. मात्र, काँग्रेसने यात फक्त अडथळा बनण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला भलेमोठे खिंडार; हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा
VIDEO: अली मर्चंटसोबत डान्स करताना पुनम पांडेचा सरकला टॉप; संतापलेले युजर्स म्हणाले, ‘बेशरम’
३२ वर्षे शेकापचा गड असलेल्या अख्ख्या गावानेच केला शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या यामागचं खरं कारण…
संभाजीराजे शिवसेनेत करणार प्रवेश? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग