Share

Hardik Pandya : सामना जिंकूनही सगळ्यांसमोर ढसाढसा रडू लागला हार्दीक पांड्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

hardik pandya talking about father after match  | भारतीय संघाने टी २० विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करून शानदार सुरुवात केली आहे. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे. या सामन्यात १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३१ धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने ११३ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन केले.

अखेरच्या षटकात निर्णायक क्षणी हार्दिक बाद झाला तरी कोहली भारताला विजय मिळवून देऊनच परतला. भारताच्या या विजयानंतर हार्दिक पांड्या खुप भावूक झाला होता. इतकंच नाही, तर तो त्याच्या वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला सुद्धा.

आपल्या यशात वडिलांचा वाटा असल्याचे हार्दिकने सांगितले. जेव्हा तो आणि त्याचा भाऊ सहा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचे शहर बदलले जेणेकरून त्यांचे दोन्ही मुलं क्रिकेट खेळू शकतील आणि खेळात करिअर करू शकतील. हार्दिक पुढे म्हणाला की, आपल्या मुलासाठी एवढा मोठा त्याग करणे ही मोठी गोष्ट आहे. माझेही माझ्या मुलावर खूप प्रेम आहे, पण त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी जे केले ते तो कधीही करू शकणार नाही.

हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. गोलंदाजीतही त्याने चांगली कामगिरी केली. त्याने चार षटकांत ३० धावा देत तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. हार्दिकच्या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघाला मोठा स्कोर उभा करता आला नाही. हार्दिकने पाकिस्तानच्या डावाच्या १४ व्या षटकात शादाब खान आणि हैदर अलीला बाद केले.

यानंतर १६ व्या षटकात मोहम्मद नवाज बाद झाला आणि पाकिस्तानच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. भारताच्या विजयानंतर हार्दिक व्यतिरिक्त इरफान पठाण आणि सुनील गावस्कर देखील भावूक झाले आणि गावस्कर यांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नाचण्यास सुरुवात केली.

१६० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३१ धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर हार्दिकने विराटसोबत ११३ धावांची भागीदारी केली. भारतीय डावाच्या सातव्या षटकात तो फलंदाजीला आला. यावेळी भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ३१ धावा होती. त्याचवेळी २० व्या षटकात तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या पाच विकेटवर १४४ धावा होती. या सामन्यात हार्दिकने ३७ चेंडूत ४० धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-
bachchu kadu : ..तर मी नवनीत राणांच्या घरी भांडी घासेल; बच्चू कडूंची मोठी घोषणा
Hardik Pandya : जिंकल्यावर वडीलांच्या आठवनीत सर्वांसमोर ढसाढसा रडू लागला पांड्या; म्हणाला, “आईबापाने आमच्यासाठी…
IND Vs PAK : हाय व्होल्टेज ड्रामा! २ धावबाद, नो बॉल, फ्री हिट शेवटच्या ओव्हरमध्ये वाढली होती धाकधूक, वाचा काय घडलं

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now