Share

VIDEO: हार्दिक पांड्याची ‘ती’ एक चूक गुजरातला घेऊन बुडाली असती, पण नशिबाने दिली साथ

आयपीएल 15 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा दारून पराभव केला आणि फायनलमध्ये जागा मिळवली. या सामन्यात जोस बटलरने 89 धावा केल्या. ज्याच्या जोरावर राजस्थान संघाने राजस्थानला 189 धावांचे लक्ष्य दिले होते.

मात्र, या खेळीदरम्यान हार्दिक पांड्याने त्याचा एक झेल सोडला. ज्याचा बटलरने पुरेपूर फायदा उठवला आणि संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.  17व्या षटकाच्या सुरुवातीला जोस बटलर 38 चेंडूत 39 धावांवर खेळत होता. त्याच षटकात त्याने गियर बदलला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारला.

पुढच्याच चेंडूवर त्याने पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान हार्दिकला झेल घेण्याची संधी होती पण तो घसरला आणि झेल पकडू शकला नाही. त्याचा पाय घसरला आणि तो जमिनीवर पडला. यानंतर बटलरने प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर पुढील 17 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह त्याने 47 धावा केल्या.

या डावात त्याने आयपीएलच्या या मोसमात 700 धावाही पूर्ण केल्या. याशिवाय एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे. जोस बटलर (89) आणि कर्णधार संजू सॅमसन (47) यांच्या शानदार फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने इडन गार्डन्सवर आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातकडून यश दयाल, रवी श्रीनिवासन साई किशोर, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या सामन्यात मिलरने महत्वाची भूमिका बजावली. त्याने तीन चेंडूत तीन षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्यानेही यामध्ये मोलाचे योगदान दिले.

तसेच गुजरात संघाकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने 21 चेंडूत 35 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मॅथ्यू वेडने 30 चेंडूत 35 धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार खेळी करत 27 चेंडूत 40 धावा केल्या. तसेच संघाचा विघ्नहर्ता ठरला तो डेव्हिड मिलर.

मिलरने या सामन्यात 38 चेंडूत 68 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार तर 5 षटकारांचा समावेश होता. तसेच राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट आणि ओबेद मॅकॉयने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. याच विजयासह गुजरात संघाने थेट अंतिम सामना गाठला आहे. त्यामुळे गुजरातचे चाहते देखील खूप खूश झाले आहेत.

https://twitter.com/RiddhiTweets_/status/1529127112338468864?s=20&t=zXTYEOcGNe0gNmlHvUfafQ

महत्वाच्या बातम्या
रणरागिणी! अवघ्या २६ व्या वर्षी बनली भारताची पहीली महीला लढाऊ वैमानिक; संघर्ष वाचून अंगावर काटा येईल
‘शेतकरी नवरा नको’ म्हणणाऱ्यांना अनाथाश्रमातल्या शितलने कृतीतून दिले खणखणीत उत्तर; वाचून वाटेल अभिमान
१८ वर्षीय मुलगा रायफल घेऊन शाळेत आला आणि गोळीबार करत १९ लहान मुलांना ठार मारलं

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now