इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या १५व्या सीजनचा विजेता संघ मिळाला आहे. रविवारी २९ मे रोजी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत ट्रॉफी जिंकली. यासह, हार्दिक पंड्याचे नाव क्रिकेट इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवले गेले, ज्याने प्रथमच आयपीएलच्या सीजनमध्ये कर्णधारपद भूषवले आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले.
हार्दिक सोबत, त्याचा भाऊ कृणाल पंड्या देखील एक भारतीय क्रिकेटर आहे, परंतु त्याचा संघ लखनौ सुपरजायंट्स एलिमिनेटर सामन्यात बाहेर पडला. हार्दिकचे संपूर्ण कुटुंब नेहमीच चर्चेत असते. त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक असो किंवा मुलगा अगस्त्य असो, पण आज आम्ही तुम्हाला हार्दिक पांड्याची वहिनी पंखुरी शर्माची ओळख करून देत आहोत.


हार्दिक पांड्याची वहिनी पंखुरी शर्मा ही भारतीय क्रिकेटर कृणाल पंड्याची पत्नी आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे आणि आयपीएलच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर तिचा दबदबा आहे. पंखुरी शर्माचा जन्म ४ मार्च १९९१ रोजी मुंबईत झाला. ती एक व्यावसायिक मॉडेल आहे आणि तिने अनेक मॉडेलिंग असाइनमेंट्स केल्या आहेत. याशिवाय तिला नृत्याचीही आवड आहे.

कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांची २०१५ मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांची चांगली मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. IPL २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर कृणाल पांड्याने पंखुरीला लग्नासाठी प्रपोज केले आणि पंखुरीनेही क्षणाचाही विलंब न लावता लग्नाला होकार दिला.

यानंतर कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांनी २७ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. मुंबई इंडियन्सची मालकिन नीता अंबानीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. पंखुरी शर्मा बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती खूप सुंदर आहे आणि तिच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

पंखुरी शर्माचे इंस्टाग्रामवर एकूण ४९४ हजार चाहते आहेत. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. आयपीएल २०२२ मध्ये देखील, ती तिचा नवरा म्हणजेच लखनऊ सुपरजायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला पाठिंबा देताना दिसली आणि अंतिम सामन्यात तिच्या दिराला आणि त्याच्या टीम गुजरात टायटन्सला पाठिंबा दिला.


हार्दिक पांड्याचे त्याची वहिनी पंखुरीसोबत खूप चांगले संबंध आहेत. तो तिला त्याची मोठी बहीण आणि मित्राप्रमाणे वागवतो आणि अनेकदा त्याच्यासोबतचे तिचे फोटो शेअर करतो. अनेक फोटोमध्ये हार्दिक पांड्याची परफेक्ट फॅमिली पाहायला मिळते. ज्यामध्ये हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या व्यतिरिक्त पंखुरी शर्मा, नताशा स्टॅनकोविक आणि त्याची आई नलिनी पांड्या दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ज्याची सर्वांना भिती होती तेच घडलं, दीपक हुडाच्या त्या कृतीवर भडकला क्रुणाल पांड्या
VIDEO: लखनौसाठी खलनायक ठरला क्रुणाल पांड्या, कॅच सोडल्यानंतर चाहते संतापले, म्हणाले..
VIDEO: लाईव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्याने केले असे कृत्य, भडकले चाहते, म्हणाले, क्रुणालचाच भाऊ आहे ना
हार्दिक पांड्या पुन्हा बनणार बाबा? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमुळे उडाली खळबळ






