Homeखेळहार्दिक पांड्या पुन्हा बनणार बाबा? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमुळे उडाली...

हार्दिक पांड्या पुन्हा बनणार बाबा? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमुळे उडाली खळबळ

भारतात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वसामान्यांसोबतच सेलेब्सही आपापल्या स्टाईलमध्ये तो साजरा करत असतात. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांनीही ख्रिसमस सेलिब्रेट केला आहे. तसेच त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सध्या सोशल मीडियावर चांगलेच हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. पण हे फोटो व्हायरल होण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. या फोटोंमध्‍ये नताशाला पाहून चाहते हैराण झाले आहे, कारण तिचा फोटो पाहून असे वाटत आहे की ती गर्भवती आहे. त्यामुळे हार्दिक आता पुन्हा बाप होणार अशा चर्चा रंगल्या आहे.

अभिनेत्री नताशाचा पती हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडियावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तो आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. त्याच्या सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

नताशा दुसऱ्यांदा गरोदर आहे, असे वाटत आहे. तसेच तिचा बेबी बंप दिसत आहे. त्यामुळेच चाहते हार्दिकला विचारत आहेत की तो खरंच दुसऱ्यांदा बाप होणार आहे का? सध्या हार्दिककडून त्याची पत्नी खरोखरच गरोदर आहे की नाही याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही पण हे जाणून घेण्यासाठी हार्दिकचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nataša Stanković 💜 (@natasastankovic__)

हार्दिकने त्याच्या इंस्टाग्रामवरून ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला तेव्हा लोक त्याला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत होते, तसेच त्याला तो वडील बनणार आहे का? असा प्रश्न विचारत होते. हार्दिकसोबतच्या या फोटोंमध्ये तो त्याची पत्नी, मुलगा आणि भाऊ कृणाल पांड्यासोबत दिसत आहे. इतकंच नाही तर त्याच्या ख्रिसमस पार्टीला अनेकांनी हजेरी लावली. फोटो पाहता त्यांच्या घरी ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे दिसते. यावेळी कुटुंब आणि मित्र सर्व एकत्र उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना काळात दोघांनी लग्न केले होते. हार्दिक आणि नताशाने लग्न आणि पत्नीच्या गर्भधारणेची बातमी एकाच वेळी दिली होती. ज्याने सर्वांनाच धक्का दिला होता. जुलै २०२० मध्येच त्यांच्या घरी मुलचा जन्म झाला होता. ज्याचे नाव हार्दिकने अगस्त्य पांड्या ठेवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
स्टिव्ह स्मिथ अडकला हॉटेलच्या लिफ्टमध्ये, १ तास अडकल्यामुळे ‘अशी’ झाली अवस्था; पहा व्हिडिओ
…तर उमेदवारांना MPSC च्या परीक्षेला बसता येणार नाही; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय
सुधीर मुनगंटीवारांवर संतापली सोनम कपूर, म्हणाली, अडाणी…; जाणून घ्या नक्की काय घडलं

ताज्या बातम्या