तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशीने महाराष्ट्राच्या घराघरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या मालिकेत त्याने राणा दाची भूमिका बजावली होती. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (hardik joshi share pet post)
राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असतो. तो अनेकदा पोस्ट शेअर करत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
हार्दिकच्या खुप जवळच्या मित्राचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याच्याच आठवणीत तो खुप भावूक झाला आहे. त्यासाठी त्याने एक खास पोस्टही शेअर केली आहे. हार्दिकच्या पाळीव श्वानाचे नाव बडी असे होते. हार्दिक त्या श्वानाला खुप जवळचा मित्र मानायचा.
आता बडीच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याच्या आठवणीत भावूक होत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. मिस यु बडी. माझा भाऊ, माझा मस्तीखोर मुलगा, माझा मित्र, माझा साथीदार अशा शब्दांत हार्दिकने त्याच्या श्वानाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे.
आज तुला जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली. पण ती घटना आजच घडल्यासारखा भास होतो, असे हार्दिकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याआधीही त्याने एक पोस्ट शेअर केली होती. तुझी उणीव आजही आम्हाला जाणवते. तु कायम आमच्यासोबत आहेस आणि राहणार, असे हार्दिकने आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
बडी हा हार्दिकच्या खुप जवळचा होता. त्याच्यासाठी एक मित्रापेक्षा जास्त होता. त्यामुळे तो नसल्यामुळे हार्दिक खुपच भावूक झाला आहे. आपल्या पाळीव श्वानावरचे हे प्रेम पाहून हार्दिकचे चाहतेही भावूक झाले आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी दहशतवादी नाही, माझे नाव बदलणार नाही; लॉकअप विनर मुन्नवर फारूकी असं का म्हणाला?
देश संकटात तेव्हा कॉंग्रेस नेते विदेशात, ज्येष्ठ नेते मोबाईलमध्ये व्यस्त; हार्दिक पटेल कॉंग्रेसवर बरसले
सायमंड्सचा मृत्यू अपघात की घातपात? बहीनीने उपस्थित केलेल्या सवालांनी संशय बळावला






