Share

लग्नाआधीच राणादा अन् पाठक बाई गेले हनिमूनला? ‘तो’ रोमँटिक फोटो होतोय व्हायरल

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी सध्या चांगलेच चर्चेत आहे. ऑनस्क्रीन नवरा-बायकोचे नाते निभावणाऱ्या दोघांनीही ३ मे ला साखरपुडा केला होता. अचानक झालेल्या या सर्व गोष्टींमुळे त्यांचे चाहतेही खुश झाले होते. (hardeek and akashaya honeymoon phtoto viral)

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अक्षयाने तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठकबाईचे पात्र इतके चांगले साकारले होते की तिने घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली. तर हार्दिक जोशीनेही आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे. अशात हे दोघेही आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

आता अक्षया आणि हार्दिक दोघेही लग्नाआधीच सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. अक्षया आणि हार्दिक दोघेही सोशल मीडियावर खुप सक्रीय असतात. तसेच अनेकदा ते फोटो शेअर करत आपण काय करतोय याची माहिती देत असतात. नुकताच आता या दोघांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये दोघेही खुप रोमँटिक दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही एकसारखेच कपडे घातलेले आहे. सध्या या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या फोटोला आतापर्यंत ९५ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

तुझ्याप्रेमाशिवाय मी अधूरी आहे, असे कॅप्शन अक्षयाने या फोटोला दिले आहे. तर त्यावर कमेंट करत हार्दिक जोशीने मी तुझ्याशिवाय काहीच नाहीये, असे म्हटले आहे. या फोटोवर अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहे. तर चाहत्यांनी या जोडीचे कौतूक केले आहे.

गेल्या महिन्यात ३ तारखेला हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा साखरपूडा झाला होता. तुझ्या जीव रंगला या मालिकेच्या सेटवरच हे दोघे प्रेमात पडले होते. लवकरच आता हे दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे. पण अजून लग्नाची तारीख समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-
माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी
काँग्रेसची तीन मतं होणार रद्द? एकमेव जागाही धोक्यात आल्याने काँग्रेसला फुटला घाम
“तर मग हा शो बंद करून…” , ‘तारक मेहता’ मालिकेच्या निर्मात्यांवर चाहते संतापले

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now