हल्दीराम कंपनी वादाच्या भोवऱ्यात, उपवासाच्या पॅकेटवर उर्दूत लिहीली ‘ही’ गोष्ट; लोकं संतापले

फराळ, नमकीन, मिठाई असे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली हल्दीराम ही कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हल्दीराम कंपनीने तयार केलेल्या उपवासाच्या पॅकेटमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. लोकांनी #Haldiram सोबत पॅकेटचा फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. (haldiram packet urdu text)

या नाराजीचे कारणही तेवढेच हैराण करणारे आहे. म्हणजे येथे विकल्या जाणाऱ्या फास्ट फूडच्या पाकिटावर उर्दूमध्ये काही गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर काही लोक सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

ट्विटर आणि इंस्टाग्रामवर अनेकांनी हल्दीरामच्या फलाहारी नमकीन पॅकेटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की पॅकेटच्या वरच्या बाजूला उर्दूमध्ये काही ओळी लिहिलेल्या आहेत. आता लोक हल्दीराम कंपनीला जाब विचारत आहेत की जेव्हा ती गोष्टी उपवासाची आहे, तर त्याचे वर्णन हिंदी किंवा इंग्रजीत नसून उर्दूमध्ये का? हल्दीराम काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच अशावेळी जनतेला प्रश्न पडत आहे की, हल्दीराम आपल्या उपवासाच्या जेवणात असे काही घालत आहे का? जे त्याला लोकांपासून लपवायचे आहे? हल्दीराम धार्मिक आणि उपवास करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करत आहे का? उर्दू लिखाणाच्या या प्रकारामुळे नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या हिंदूंचा विश्वासघात झाला आहे, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

त्याचबरोबर काहींनी हल्दीरामवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तर काहींनी याप्रकरणी हल्दीरामने माफी मागावी, असे म्हटले आहे. पण काही लोक असे आहेत, जे उर्दूला भारतीय भाषा म्हणून या पॅकेटवर लिहिलेली ओळ योग्य असल्याचे सांगत आहेत.

यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही दिसत आहे, ज्यामध्ये एक महिला हल्दीरामच्या स्नॅक्सचे पॅकेट हातात घेऊन याप्रकरणी स्टोअर मॅनेजरकडून जाब मागत आहे. अशा स्थितीत मॅनेजरलाही राग येतो. मात्र या पॅकेटवर लिहिलेल्या उर्दूबाबत तो काहीच उत्तर देत नाही.

त्यानंतर महिलेने सांगितले की, मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्हाला असे काय लपवायचे आहे आणि पॅकेटवर उर्दूमध्ये काय लिहिले आहे? यावर स्टोअर मॅनेजर म्हणतो की, तुम्ही काहीही करा, मी यावर काहीही बोलणार नाही. सधा हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध ३ वर्ष विष ओकत राहिले इम्रान खान, पंतप्रधान मोदींनी अशी पलटली बाजी, आता आले शहाणपण
भावनिक! जिथं आई 25 वर्षे सफाई कामगार म्हणून करत होती काम, तिथंच आमदाराचे प्रमुख पाहुणे म्हणून आगमन
‘वसंत मोरेंची पक्षातील लोकांनीच राजकीय हत्या केली आहे’, रुपाली पाटलांचा मनसेवर गंभीर आरोप