राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सध्या देशात ज्ञानवापीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच तापला आहे. ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे (SP) खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी एक खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे.
आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे ‘वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत ‘शिवलिंग’ नाही,’ असा खळबळजनक दावा शफीकुर्रहमान बर्क यांनी केला आहे.
त्याचबरोबर अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत ते म्हणाले की, “मी अजूनही सांगतो की तिथे मशीद आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आमच्याकडून मशीद कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कितीही त्याग करावा लागेल, आम्ही देऊ, मरेपर्यंत ज्ञानवापी सोडणार नाही. मुस्लिमांकडून कोणीही ज्ञानवापी घेऊ शकत नाही.’
याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. इतिहासात खोलवर गेल्यास ज्ञानवापी मशिदीत ‘शिवलिंग’ नव्हते हे कळते. हे सर्व चुकीचे असल्याच त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप देखील केला आहे. ‘आम्हाला टार्गेट केले जात आहे. मशिदींवर हल्ले होत आहेत. सरकार असे चालत नाही. सरकारने कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करावे. मात्र, राज्यात कायद्याचे राज्य नाही, बुलडोझरचे राज आहे,’ असं म्हणत शफीकुर्रहमान बर्क यांनी भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, याआधी शफीकुर्रहमान बर्क यांनी स्पष्ट होतं की, ‘मुस्लिमांना दाबण्याचं सरकारचं धोरण देशाच्या विरोधात आहे. आम्ही इथून आलो आहोत, आपण इथेच राहू आणि तिथेच मरु. ‘मुस्लिमांच्या विरोधात असे धोरण अवलंबले गेले असेल तर आमचेच नाही तर देशाचेही नुकसान होईल,’ असही ते म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
फक्त पेट्रोल डिझेल नाही तर महागाईमध्ये मोदी सरकारने या ५ गोष्टीही केल्यात स्वस्त, घ्या जाणून..
मी खूप निराश आहे, माझ्यासोबत यापुर्वीही असे घडलेय..; रोहीत शर्माच्या वक्तव्याने खळबळ
घोषणा मोठी पण दिलासा नाही! राज्य सरकारकडून पेट्रोल डिझेलवर कर कमी मात्र दर ‘जैसे थे’च?
गावस्करने हेटमायरच्या पत्नीवर केली ‘ही’ अश्लील कमेंट, संतापलेले चाहते म्हणाले, इतरांच्या बायकोवर..