Share

स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होती राजकीय पक्षाशी संबंधित महिला; नावही आले समोर

गेल्या काही महिन्यांपासून सेक्स रॅकेटची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहे. अनेक ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु आहे. पोलिसही त्या सेक्स रॅकेट्सचा पर्दाफाश करत आहे. असे असताना आता मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (gwaliar sex racket police arrest couple)

मध्य प्रदेशातील ग्वालियरमधल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या सेक्स रॅकेटसाठी दिल्लीहून मुली आणल्या जात होत्या आणि त्यांचा देहव्यापार केला जात होता. ग्वालियरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली हा देहव्यापार सुरु होता. पती आणि पत्नी मिळून हे सेक्स रॅकेट चालवत होते.

स्पा सेंटरवर कारवाई करत ग्वालियर पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टवर बोलावलेल्या दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी हे स्पा सेंटर चालवत होते. या दोघांविरुद्ध कायद्याच्या अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे.

वसुंधरा टॉवर येथील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी एक खोटा ग्राहक बनवून एका व्यक्तीला तिथे पाठवले, तर तिथे खरंच सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती समोर आली. त्या व्यक्तीने तिथल्या काही गोष्टीही रेकॉर्ड केल्या.

फुटेज रेकॉर्डिंगमुळे सीएसपी मुनीश राजोरिया आणि त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री शहराच्या मध्यभागी असलेल्या नाइन स्ट्रीट स्पा सेंटरवर छापा टाकला. येथून पोलिसांना अनेक आक्षेपार्ह साहित्य मिळाले आहे. तसेच तिथे दोन मुलीही ग्राहकांसोबत आढळून आल्या होत्या.

या रॅकेटमध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेचे नावही समोर आले आहे. याचाही तपास पोलीस करत आहेत. वीजबिलावरुन फ्लॅटच्या मालकाचा शोध घेण्यात येत असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुली घटनास्थळी आढळून आल्या आहेत, ज्यांना ग्राहकांना खूश करण्यासाठी बाहेरून बोलावण्यात आले होते. या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दंडोतिया म्हणाले की, सध्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मला पाठिंबा देऊन संसदेत पाठवणाऱ्या आमदाराला टाटा सफारी देणार; उमेदवाराची मोठी ऑफर
काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी नाही म्हणून बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; केले ‘हे’ गंभीर आरोप
बॉलिवूडला टक्कर! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने रचला इतिहास, तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now