मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (guvahati police arrested sanjay bhosle )
एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करताना दिसून येत आहे.
अशात कोणाच्या ध्यानीमनी नसताना शिवसेनेच्या प्रेमापोटी साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख व कट्टर शिवसैनिक संजय भोसले हे थेट गुवाहटीत पोहचले. ते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी हॉटेल रेडिसन ब्लु येथे पोहचले होते. तसेच त्यांनी शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे परत येण्याचे आवाहन केले आहे.
अशात संजय भोसले यांना गुवाहटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले यांना ताब्यात घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे राज्यभरात संजय भोसले यांच्याच नावाची चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. शिंदेंच्या बंडामुळे दोन गट पडले आहे. एक गट शिंदेंच्या सपोर्टमध्ये आहे, तर दुसरा गट उद्धव ठाकरेंच्या सपोर्टमध्ये आहे. अशात एकनाथ शिंदे यांना पुन्हा मातोश्रीवर चला हे सांगण्यासाठी संजय भोसले गुवाहटीत पोहचले होते.
शिवसेना जिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या, अशा मजकूरची पाटी त्यांनी आपल्या अंगावर लावली होती. ते हॉटेलबाहेर उभे असताना गुवाहटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मुख्यमंत्र्यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला, राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’; शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे आरोप
वाकडा पाय टाकला, तर पाय काढून टाकण्यात येईल; राणेंच्या धमकीनंतर शरद पवारांचा व्हिडिओ व्हायरल
गुलाबराव पाटील शिंदे गटासोबत नाहीत, ते तर मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निरोप घेऊन गुवाहाटीला गेलेत?