राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते पोलिसांच्या ताब्यात होते. पण आता तब्बल १८ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर सदावर्तेंच्या अडचणी कमी झाल्या आहेत.
२०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्येही त्यांना अटकपुर्व जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर होताच आणि जेलमधून बाहेर येताच गुणरत्न सदावर्ते यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यांची पत्नीही त्यांच्यासमवेत होती. आर्थर रोड जेलबाहेर त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
तुरूंगातून बाहेर येताच सदावर्तेंनी राज्य सरकारविरोधात छाती बडवायला सुरूवात केली आणि हम है हिंदुस्थानी अशा घोषणा दिल्या. तसेच भारताच्या संविधानापेक्षा कोणी मोठा नाही. यापुढे आमचा केंद्रबिंदु असेल भ्रष्टाचार. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू.
जय श्री राम, जय भीम आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे देश जिंकत असतात, आतापुरतं एवढंच असे म्हणत पुढे बोलू, असं सदावर्ते यावेळी म्हणाले. दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात २०२० साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातही त्यांना अटकपुर्व जामीन मंजूर झाला आहे.
२५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. हे आदेश न्यायालयानेच दिले होते. या प्रकरणात त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनीही अर्ज केला होता पण पुणे पोलिसांना यश आले नाही. त्यांच्या सुटकेचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर अटक करता आलेली नाही.
आता तुरूंगातून सुटल्यानंतर सदावर्ते महाविकास आघाडी सरकारविरोधात काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. बाहेर येताच त्यांनी आपली मानसिकता काय आहे हे सांगून टाकले. तसेच छाती बडवत राज्य सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली. सध्या त्यांच्या सुटकेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
मुंबईकडे सचिन-जहीरसह १८ सपोर्टिंग स्टाफची फौज असताना पराभवासाठी रोहित का जबाबदार?
आझम फक्त माझा आहे म्हणत तरुणीने घेतली छतावरुन उडी, आता कंबर मोडल्यानेमुळे चालणे झाले अशक्य
रिल स्टार्ससाठी खुशखबर! इन्स्टाग्रामने आणले टिकटॉकसारखे भन्नाट फिचर, reels बनणार आणखी मजेदार
सचिनची लाडकी सारा तेंडुलकर दिसणार चित्रपटात? बॉलिवूड डेब्यूबद्दल समोर आली ‘ही’ माहिती