गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी कर्मचारी संप करीत आहे. अशात गुरुवारी उच्च न्यायालयाने याबाबत एका मोठा निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. (gunratna sadavarte on devendra fadanvis)
सर्व कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर रहावे. जे कामगार न्यायालयाने दिलेल्या मुदतीत कामावर येणार नाहीत, त्याच्यावर राज्य सरकार कारवाई करु शकते. तसेच २२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर येत नाही, त्यांच्यावर कारवाई करु नका, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शन दिली जावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी भाजप नेत्यांचे कौतूक केले आहे.
कष्टकरी, ५ महिन्यांपासून उपाशी मरत होते, ठाकरे सरकारने त्यांना विचारलं नाही. पण देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नवनीत राणा, धोंडे, अनुराधा पौडवाल यांनी ५ महिने त्यांना अन्न दिलं. त्यांचं मी खरोखरच कौतूक करतो. त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानणार नाही, कारण त्यांनी पोटाची भूक भागवली आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
तसेच शरद पवार, अजित पवार, यांच्यामुळे १३८ मृत्यु झाले. त्यांच्यवर जातीच्या राजकारणाचे आरोप झाले. पण आज न्यायालयाने त्यांचा क्लिन बोल्ड केला. आज न्यायालयाने त्यांना आरसा दाखवला. आज ते गलिच्छ राजकारणी ठरलेले आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे.
न्यायालयाने कष्टकऱ्यांना सुखकर गोष्ट दिली आहे. पेन्शनच्या बाबतीत न्यायालयाने गांभीर्याने घेतलं. त्यामुळे १८ हजार पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे. ग्रॅज्युएटी आणि फंडबाबतही न्यायालयाने निकाल दिला आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून गावकऱ्यांनी विवाहित प्रेमी युगुलची ढोल-ताशांच्या गजरात काढली धिंड; व्हिडिओ केला व्हायरल
सुप्रिया सुळेंसोबतच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शशी थरुर यांनी दिली रोमॅंटीक प्रतिक्रिया; म्हणाले..
जोडप्यांना किस करण्यास आणि एकत्र झोपण्यास बंदी, ‘या’ शहरात अजब-गजब लॉकडाऊन, कोरोनाचा हाहाकार