राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील अन्य तीन आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सरकार धोक्यात येत असल्याच चित्र दिसताच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाचीच ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे.
याचबरोबर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवला असल्याच देखील आता समोर आलं आहे. याचबरोबर आज कृषीमंत्री दादा भुसे हे देखील गुवाहाटीला पोहचतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यामुळे आता शिंदेंची नाराजी दूर होणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
तसेच पाटील यांच्यासह गुवाहाटीत दाखल झालेल्या आमदारांचं शिंदे आणि तिथे उपस्थित आमदारांनी स्वागत केलं असल्याच देखील समजत आहे. यामुळे आता राज्याचे लक्ष सध्या एकनाथ शिंदेंच्या राजकीय भूमिकेकडे लागलं आहे. शिंदे ऑफर स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, अजूनही शिवसेना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश आलेलं नाहीये. राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे.
यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्य सरकारला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेली ही बंडखोरी तात्काळ कारणांनी झाली नसून, त्यामागे अनेक दिवसापासूंनची कारणं जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभेच्या प्रांगणात याल तेव्हा इथे आसामचे नेते येणार नाहीत; पवारांची बंडखोरांना थेट धमकी
ईडी-आयकरपासून वाचण्यासाठी शिवसेना आमदार-खासदार शिंदेंच्या गटात, धक्कादायक माहिती आली समोर
बंडखोरांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा शिवसेना आमदारांना इशारा