इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस स्टेशन (Police station) परिसरात आजीचा आणि नातीचा एका वेदनादायक अपघातात मृत्यू झाला. निकाल घेण्यासाठी आजी नातीसोबत शाळेत जात होती. लवकर पोहोचण्यासाठी शॉर्टकट अवलंबला आणि काळाने घात केला. घाई-घाईत रेल्वे रुळ ओलांडण्याची त्यांनी चूक केली. दोघींनाही पलीकडून येणाऱ्या ट्रेनने धडक दिली आणि त्यांचा मृत्यू झाला.(Grandmother and granddaughter killed in train accident)
इंदूरच्या बिजलपूर येथे राहणाऱ्या चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नववीत शिकणारी त्यांची मुलगी तनू हिचा निकाल लागला होता. निकाल घेण्यासाठी ती आजीसोबत शाळेत जात होती, पण दोघींनी शॉर्टकट घेतला. रेल्वेरुळाच्या पलिकडे तिची शाळा होती. आजी-नात पूल न ओलांडून शॉर्टकटच्या गडबडीत ट्रॅक ओलांडू लागल्या. त्यांच्या या चुकीमुळे त्यांना प्राण गमवावा लागला आहे.
नात आजीसोबत रुळ ओलांडत असताना तिथून भरधाव वेगात ट्रेन गेली. दोघींनाही ट्रेनची धडक बसली. तनुने उडी मारली आणि काही फूट दूर पडली, तर तिची आजी शारदा ट्रेनने कापली गेली. आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने धाव घेऊन दोघींना उचलले. आजीचा जागीच मृत्यू झाला होता, पण तनू श्वास घेत होती, तिच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं. रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तनूचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि राजेंद्र नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तोपर्यंत कुटुंबीयही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तनु 14 वर्षांची आणि आजी 56 वर्षांची होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
शहर के राजेंद्र नगर में ट्रेन से टकराने पर दादी और पोती की मौत हो गई। घटना राजेंद्र नगर के धनवंतरी नगर की है।https://t.co/OsLjHkTQK6#Indore #IndoreNews #MPNews #MadhyaPradesh #crimesnews #crime pic.twitter.com/eHH9zUlUfh
— NaiDunia (@Nai_Dunia) April 6, 2022
पुलाखाली ज्या ठिकाणी अपघात झाला तो वर्षभरातील पाचवा अपघात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. लोक शॉर्टकटमुळे ट्रॅक ओलांडतात आणि अचानक ट्रेन येते. पोकळी असल्याने उभे राहण्यास फारशी जागा नसते म्हणून अनेकजण अपघाताचे बळी होतात. अनेकवेळा जीआरपी आणि राजेंद्र नगर पोलिस ठाण्याच्या परिसरात गोंधळ होत असतो. जीआरपी आणि रेल्वेकडे तक्रार केली पण अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कोणत्याही प्रकाची तरतूद केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
आजीचा हात पकडून शाळेत निकाल घ्यायला चालली होती चिमुकली, रेल्वेने धडक दिली आणि.., वाचून काळीज फाटेल
चालत्या ट्रेनमध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांना करावी लागली होती अंघोळ, त्यामागे होते हे मोठे कारण
धावत्या ट्रेनमधून पडली महिला, RPF जवानाच्या प्रसंगावधनामुळे वाचले प्राण, पहा थरारक व्हिडीओ
अनाथांचे पोट भरण्यासाठी ट्रेनमध्ये मागितली भीक; स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली