Homeइतरअनाथांचे पोट भरण्यासाठी ट्रेनमध्ये मागितली भीक; स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली...

अनाथांचे पोट भरण्यासाठी ट्रेनमध्ये मागितली भीक; स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली “

पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सिंधूताई सपकाळ या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राण ज्योत मावळली आहे.

त्यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांना सांभाळले आहे. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊयात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच ‘पद्म पुरस्कार’ जाहीर करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या ‘सिंधुताई सपकाळ’ यांचाही सहभाग होता. (Sindhutai Sapkal baigraphy)

अनाथ मुलांची काळजी घेणाऱ्या सिंधुताईंना १,५०० मुले, १५० हून अधिक सूना आणि ३०० हून अधिक जावई असल्याचे सांगितले जाते. सिंधू ताईंनी आपले आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेत घालवले आणि महाराष्ट्राच्या ‘मदर तेरेसा’ झाल्या. अनाथांचे पोट भरण्यासाठी त्यांनी रस्त्यावर भीक देखील मागितली. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर सिंधुताई म्हणाल्या होत्या की, हा पुरस्कार माझ्या सहकाऱ्यांचा आणि माझ्या मुलांचा आहे. त्यांनी लोकांना अनाथ मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन केले.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका साध्या गोपालक कुटुंबात झाला. परंपरावादी कुटुंब असल्याने सिंधुताईंना चौथ्या वर्गातच शाळा सोडावी लागली. वयाच्या १० व्या वर्षी २० वर्षांच्या पुरुषाशी लग्न केले.

काही वर्षांनी त्या गरोदर राहिली. नवऱ्याने त्यांच्या पोटात लाथ मारून त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर त्यांनी बेशुद्धावस्थेत गायींमध्ये एका मुलीला जन्म दिला आणि नंतर हाताने नाळही कापली.

बेघर असल्याने त्यांनी मुलीला स्टेशनवर सोडले. या सगळ्या गोष्टींनी त्यांना हादरवून सोडलं. त्यांनी आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. नंतर पोट भरण्यासाठी त्या ट्रेनमध्ये भीक मागू लागल्या. कधी-कधी जळणाऱ्या प्रेतावर भाकरीही भाजून खाल्ली.

ट्रेनमध्ये भीक मागून त्या स्टेशनवरच राहायच्या. एके दिवशी सिंधुताईंना रेल्वे स्टेशनवर एक मूल दिसले. येथूनच त्यांना निराधार मुलांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली.

यानंतर एक न संपणारी साखळी सुरू झाली, जी आज महाराष्ट्रातील ६ मोठ्या समाजसेवी संस्थांमध्ये रूपांतरित झाली आहे. या संस्थांमध्ये १५०० हून अधिक निराधार मुले कुटुंबाप्रमाणे राहतात. सिंधुताईंच्या संस्थेत ‘अनाथ’ हा शब्द वापरण्यास मनाई आहे. मुले त्यांना माई म्हणतात. या आश्रमशाळांमध्ये विधवा महिलांनाही आश्रय मिळतो. ते स्वयंपाक करण्यापासून ते मुलांची काळजी घेण्यापर्यंतचे काम करतात.

पद्मश्री सिंधुताई यांना आतापर्यंत ७०० हून अधिक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजवर मिळालेल्या मानधनातून जी काही रक्कम मिळाली, तीही त्यांनी मुलांच्या संगोपनात खर्च केली. सिंधुताईंना डी.वाय.पाटील संस्थेने डॉक्टरेटही दिली आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला आणि ५४व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्येही प्रदर्शित करण्यात आला.

हे ही वाचा
धक्कादायक! अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
बालविवाह झाल्यानंतर गर्भवती असताना पतीने घराबाहेर काढले, नंतर झाल्या १५०० मुलांच्या आई
अनाथांची मातृदेवता हरपली ..!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली