राज्यात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये अनेक तरूणांनी सहभाग घेतला होता. त्यातील बरेच तरूण निवडूणही आहे. अनेक मतदारांनी तरूण उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण निवडणूक झाल्यानंतर एका धक्कादायक घटनेने सगळेच हादरले.
एक उमेदवार बिनविरोध निवडून आला पण त्याला याचा आनंदही साजरा करता आला नाही. कारण तो निवडून आला आणि १५ दिवसातच त्याने या जगाचा निरोप घेतला. संग्राम सीताराम गुरव असे त्या उमेदवाराचे नाव आहे. त्यांचे वय २७ होते.
कोल्हापुरामधील सडोली दुमाला (ता. करवीर) या ग्रामपंचायतीतून ते बिनविरोध निवडून आले होते. ते निवडून आल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण होते पण त्यांच्या या आनंदाचे कधी दुखात रुपांतर झाले कोणालाच कळाले नाही. संग्रामच्या निधनाची बातमी गावात पसरताच गावात शोककला पसरली.
या घटनेमुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे. संग्रामला तीन चार दिवसांपुर्वीच ताप आला होता. त्याच्यावर गावातल्या एका दवाखान्यात उपचार सुरू होते. तपासणी केल्यानंतर असे आढळले की संग्रामला डेंग्यू झाला आहे. उपचार सुरू असताना अचानक त्याची प्रकृती गंभीर झाली होती.
प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला कोल्हापुरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डेंग्यू आणि तापामुळे आधीच त्याची प्रकृती खुप खालावली होती. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले पण त्याचे शरीर या उपचारांना साथ देत नव्हते. संग्रामच्या मृत्युची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सडोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. यामध्ये प्रभाग क्रमांक तीनमधून संग्रामची निवड झाली होती. गेल्यावर्षीही तोच निवडून आला होता. तो सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामगिरी पार पाडणार होता पण त्याच्याआधीच काळाने घाला घातला.
महत्वाच्या बातम्या
pune : जिथे भाईगिरी केली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, पुण्यातील तरुणांचा व्हिडिओ पुन्हा आला समोर
Gulabrao patil : लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाला एकही जागा मिळणार नाही? गुलाबराव पाटलांचे सुचक वक्तव्य
Uddhav thackeray : ठाकरेंना सोडलं तो आयुष्यातील सर्वात दु:खाचा क्षण; शिंदे गटातील बड्या मंत्र्याचे वक्तव्य
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; गंभीर आजारी असतानाही पक्षासाठी गेले होते धावून