Share

gram panchayat election : पु्न्हा एकदा भाजपच नंबर वन! राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप-शिंदे गटाचा बोलबाला

Gram panchayat election | राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही चांगलीच बाजी मारली असून राष्ट्रवादीने भाजपला चांगलीच टक्कर दिली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळालं आहे. पण यामध्ये काँग्रेसला खास अशी कामगिरी करता आली नाही.

पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिंदे गटाने मोजक्या ठिकाणी विजय मिळवला आहे. स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबिज केली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. ८८ जागांपैकी ४१ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. त्यानंतर शिवसेनेने १३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

भाजपकडे ५ तर काँग्रेसकडे ४ ग्रामपंचायची गेल्या आहेत. दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून आलं आहे. पुणे जिल्ह्यात ६१ ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये ३० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने मजल मारली आहे. तर भाजपने ३ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेने २ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

शिंदे गटाने ३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला पुण्यात एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही. स्थानिक आघाड्यांनी २३ जागांवर विजय मिळवला आहे. यवतमाळमध्ये दिग्गजांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यवतमाळमधील ७० ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत.

त्यामध्ये ७० पैकी ३३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या हाती आल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपले वर्चस्व राखत विजय मिळवला आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेने ३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे तर शिंदे गटाला एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही.

भाजपने २० ग्रामपंचायतींच्या जागांवर मजल मारली आहे तर राष्ट्रवादीने ९ जागांवर विजय मिळवला आहे. मनसेला एकच जागेवर विजय मिळाला आहे. जळगावात शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरशी गाठली आहे. एकूण ग्रामपंचायत जागा १३ होत्या त्यापैकी ३ शिवसेनेने, ३ शिंदे गटाने, राष्ट्रवादीने ३ आणि अपक्ष उमेदवारांनी ४ जागा जिंकल्या आहेत.

भाजप आणि काँग्रेसला जळगावात एकही जागा मिळाली नाही. तसेच धुळ्यात भाजपने सगळ्यांना धुळ चारत विजय मिळवला आहे. धुळ्यात एकूण ३३ ग्रामपंचायतीच्या जागा होत्या त्यातील ३२ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यानंतर फक्त राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. बाकी कोणत्याच पक्षाला एकही ग्रामपंचायत जिंकला आली नाही.

अहमदनगरमध्येही राष्ट्रवादीने ग्रामपंचायतीच्या सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. भाजपने त्यांना चांगली टक्कर दिली होती. अहमदनगरमध्ये ग्रामपंचायतीच्या ४५ जागा होत्या त्यातील राष्ट्रवादीने २० तर भाजपने १६ जागा जिंकल्या आहेत. कोल्हापुरातही राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. नंदुरबारमध्ये ७५ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले आहे. निकाल पाहिले तर फक्त भाजप आणि राष्ट्रवादीनेच बऱ्यापैकी ग्रामपंचायतींवर वर्चस्व गाजवले आहे पण मविआकडे जास्त जागा आहेत. मविआने १८१ जागांवर विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या
Shivsena : दसरा मेळाव्यावरून आक्रमक शिवसेना थेट शिवाजी पार्कमध्ये घुसणार; सरकारला फुटला घाम
Sanjay rathod : राठोडांना आसमान दाखवण्यासाठी शिवसेनेने खेळला मोठा डाव; पोहरादेवीच्या महंतानाच उतरवणार रिंगणात
Crime : पोलिसांनी डॉक्टरची गाडी थांबवली, तपासात असे काही सापडले की डॉक्टरची रवाणगी थेट तुरुंगात
BSF : BSF जवानांना बांगलादेश सीमेजवळ खड्ड्यात सापडली ८ पोती; आतमधला ऐवज पाहून सगळेच हादरले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now