भारत(India): भारत देश स्वातंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झालीत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम आयोजित केली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर आपला राष्ट्रध्वज लावावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
पिंगली वैंकैया यांनी आपल्या तिरंग्याची रचना केली. २ ऑगस्टला त्यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर तिरंग्याचे छायाचित्र दर्शवावे, असेही पंतप्रधान म्हणाले.
या मोहीमेसाठी एक विशेष गाणंही प्रदर्शित करण्यात आलंय. त्याचे टायटल सुद्धा ‘हर घर तिरंगा’ हेच आहे. कला, क्रिडा तसंच विविध क्षेत्रातील अनेक कलाकार या अल्बममध्ये पाहायला मिळत आहे. पण बऱ्याच जणांनी या मोहिमेचा विरोध केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चेला उधाण आले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर हा ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेपासून खूप प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ‘श्री’ नावाचे पात्र तो करीत होता. आता ‘मुरांबा’ या मालिकेमध्ये काम करतोय. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांना त्यानं ही पोस्ट शेअर करत सुनावलं आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
शशांकने पोस्ट मध्ये लिहलंय की,
चला चला विरोध करा. सगळ्या बक्कळ पैसे कमावणाऱ्या सेलिब्रिटींना घेऊन केलेल्या गाण्याला विरोध करा. यातून अजिबात प्रेरित वगैरे तर होऊच नका. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनसुद्धा एक ऊर्जा मिळते वगैरे सगळं खोटं आहे. जुन्या पिढ्यांनी जी आत्तापर्यंत वाट लावली, तीच देशासाठी योग्य आहे. तरुण, वेगळा दृष्टीकोन वगैरे काही नसतं.
भारताचा झेंडा घरो घरी असावा…. ही सकारात्मक भावना १४० कोटी लोकांच्या मनात रुजावी यासाठी आपल्या सरकारला मोहीम करावी लागते?
जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही समस्या आहेत, पण जेव्हा जगासमोर मांडलेल्या त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा ते सगळे कट्टर होतात. देशासाठी पेटून उठतात. आपण केव्हा कट्टर भारतीय होणार ? आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार ?
जय हिंद.
शशांक या अभियानाला विरोध करतोय असा संदेश या पोस्ट मधून बहुतेकांना गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
Election: आमदाराला त्याच्याच साध्या कार्यकर्त्याने धोबीपछाड देत जिंकली निवडणूक; केला सुपडा साफ
Rahul Gandhi: राहूल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; अक्षरशः रस्त्यावरून फरफटत नेले
Preity Zinta: ३ अभिनेत्रींना रिजेक्ट केल्यानंतर सलमानच्या ‘या’ चित्रपटात प्रिती झिंटाला मिळालं होतं काम
Eknath Shinde: बंडानंतरही औरंगाबादमध्ये शिंदे गटाचा दणदणीत विजय; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दारूण पराभव