संजय दत्त आणि गोविंदा हे दोघेही बॉलीवूडचे सुपरस्टार आहते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. म्हणून या दोघांची खुप चांगली मैत्री होती. पण एका काळानंतर या दोघांच्या मैत्रीमध्ये खुप मोठी दरार आली. संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.
या चित्रपटानंतर ते स्टार झाले होते. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण संजय दत्तला खुप जास्त नशेची सवय झाली होती. त्यामूळे त्यांना काही दिवस बॉलीवूडपासून खुप लांब जावे लागले होते. ज्यावेळी संजय दत्त बाहेर देशामध्ये उपचार घेत होते. त्यावेळी गोविंदा बॉलीवूडमध्ये स्टार झाले होते. बॉलीवूडमध्ये परत आल्यानंतर संजय दत्त आणि गोविंदाने ‘दौ कैदी’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.
या चित्रपटाच्या शुटींगवेळी गोविंदा अनेकवेळी सेटवर खुप उशीरा यायचे. त्यामूळे संजय दत्तचा खुप वेळ वाया जाऊ लागला होता. पण तरीही ते काही बोलले नाही. कारण त्यांना त्यांच्या करिअरची चिंता होती. या चित्रपटानंतर गोविंदा आणि संजय दत्तने ‘ताकतवर’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले. हा चित्रपट डेविड धवनचा दिग्दर्शक म्हणून पहीला चित्रपट होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला.
चित्रपट फ्लॉप झाला असला तरी डेविड धवन, संजय दत्त आणि गोविंदा या तिघांची मैत्री सुपरहिट झाली होती. त्यानंतर संजय दत्त आणि गोविंदाने ‘आंदोलन’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले. या कालावधीमध्ये संजय दत्त मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणामूळे अडचणीमध्ये होते. त्यामूळे त्यांच्या करिअरवर देखील या सर्वांचा परिणाम झाला होता.
पण १९९७ मध्ये डेविड धवन, गोविंदा आणि संजय दत्तने या तिघांनी एकत्र ‘हासिना मान जायेगी’ हा चित्रपट केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यामूळे डेविड धवनने या दोघांना घेऊन ‘जोडी नं1’ चित्रपटाची तयारी सुरु केली. जोडी नं 1 चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.
त्यामूळे डेविड धवनने या दोघांसोबत ‘एक और एक ग्यारा’ चित्रपटाची शुटींग सुरु केली. या चित्रपटाची शुटींग सुरु होईपर्यंत संजय दत्त आणि गोविंदामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. ते दोघे खुप चांगले मित्र होते. पण या चित्रपटाच्या सेटवरच या दोघांच्या भांडणाला सुरुवात झाली.
चित्रपटाचा एक सीन शुट करत असताना गोविंदाला तो सीन जमत नव्हता. त्यामूळे त्यांनी डेविड धवनला सांगितले की, ‘मला हा सीन जमत नाहीये. त्यामूळे आपण या सीनमध्ये थोडे बदल करुयात.’ पण डेविड धवनने या गोष्टीला नकार दिला. त्यामूळे या दोघांमध्ये वाद सुरु झाले. ही गोष्ट संजय दत्तला समजल्यानंतर संजय दत्तने डेविड धवनची बाजू घेतली आणि गोविंदाला सांगितले हा सीन असाच व्हायला हवा. यावरुन गोविंदाला राग आला आणि त्यांनी संजय दत्तसोबत बोलणे खुप कमी केले.
त्यानंतर अचानक एक दिवस संजय दत्त आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकिल यांची एक टेप लीक झाली. या टेपमध्ये संजय दत्त अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलसोबत गोविंदाबद्दल बोलत होते. तो छोटा शकीलला सांगत होता की, ‘गोविंदा सेटवर खुप उशीरा येतो. त्यामूळे सर्वांनाच खुप त्रास होतो. तुम्ही त्याला समजवून सांगा.’
ही गोष्ट मिडीयामध्ये देखील पोहाचली होती. त्यावेळी खुप मोठा प्रॉब्लेम झाला. कारण मीडियाने या गोष्टीला खुप उचलून धरले. गोविंदाला जेव्हा ही गोष्ट समजली. तेव्हा त्यांना खुप राग आला. ते म्हणाले की, ‘संजय दत्त माझे खुप चांगले मित्र होते. त्यांना अडचण होती. तर मग त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते. असे कोणालाही काहीही बोलायला नको होते.’
यावर संजय दत्तने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण त्यांचे म्हणणे होते की, ‘मी कोणाशीही बोललो नाही. ती टेप खोटी आहे.’ पण गोविंदाचा यावर विश्वास नव्हता. हा वाद खुप जास्त वाढला आणि शेवटी या दोघांनी एकमेकांसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.
एक और एक ग्यारा हा संजय दत्त आणि गोविंदाचा शेवटचा एकत्र चित्रपट होता. त्यानंतर या दोघांनी परत कधीही एकत्र काम केले नाही. एवढेच नाही तर त्या दिवसानंतर या दोघांनी एकमेकांसोबत बोलणेसुद्धा सोडून दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
डुग्गूचे अपहरण कोणी केले? पुणे पोलिसांनी लावला छडा
पुण्यात अपहरण झालेला डुग्गू सापडला तरी कसा? वडिलांनी सांगितली थरारक कहाणी
सुरक्षारक्षकाची नजर चुकवून ‘मन्नत’मध्ये घुसला होता शाहरूखचा चाहता; पकडल्यावर म्हणाला,…
धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, लग्न म्हणजे पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा